Home /News /entertainment /

…म्हणून राधिका आपटेनं सुपरस्टारच्या कानाखाली लगावली

…म्हणून राधिका आपटेनं सुपरस्टारच्या कानाखाली लगावली

राधिका आपटे (Radhika Apte) रील लाइफमध्ये जशी बोल्ड दिसते तशीच रिअल लाइफमध्येही ती बिनधास्त आहे.

  मुंबई, 29 नोव्हेंबर: चित्रपट असोत, वा वेब सीरिज राधिका आपटेचं (Radhika Apte) नाव आघाडीवर घेतलं जातं. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. रील लाइफमध्ये जशी राधिका बोल्ड दिसते तशीच रिअल लाइफमध्येही ती बिनधास्त आहे. एकदा शूटिंगच्या वेळी राधिकाने चक्क एका सुपरस्टारच्या कानशीलातही लगावली होती. काय घडलं होतं? झालं असं की, राधिका एका तामिळ सिनेमाचं शूटिंग करत होती. त्यावेळी सेटवर साऊथ इंडस्ट्रीमधील एका बड्या कलाकाराने तिच्याशी गैरवर्तन केलं. तिच्या पायाला गुदगुल्याही केल्या. यामुळे राधिकाचा संताप अनावर झाला. तिने सरळ त्याच्या कानाखाली लगावली. नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आली असताना तिने हा किस्सा सांगितला. स्वत:ला सुपरस्टार म्हणवून घेणारा माणूस एखाद्या महिलेशी असं कसं वागू शकतो? असा सवाल तिने उपस्थित केला होता. राधिका म्हणते, ‘मी त्या माणसाला या आधी कधीच भेटले नव्हते, माझी आणि त्याची मैत्री नव्हती. मग तो माझ्याशी असा कसा वागू शकतो? मला त्याच्या वागण्याचा प्रचंड धक्का बसला होता.’
  View this post on Instagram

  A post shared by Radhika (@radhikaofficial)

  राधिका आपटे या मराठी मुलीने बॉलिवूड काय पण परदेशातही आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमवलं आहे. ‘बदलापूर, कबाली, पॅडमॅन, हंटर, बाजार’ असे अनेक चित्रपट केले आहेत. नेटफ्लिक्सच्या अनेक वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. 'घो मला असला हवा' या मराठी चित्रपटामध्येही ती झळकळी होती. ‘अ कॉल टू स्पाय’ या चित्रपटामध्येही राधिका आपटे झळकणार आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या