मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘वारंवार कोरोना चाचण्या करुन मी वैतागले’; राधिका आपटेनं सांगितला लॉकडाऊनमधील शूटिंगचा अनुभव

‘वारंवार कोरोना चाचण्या करुन मी वैतागले’; राधिका आपटेनं सांगितला लॉकडाऊनमधील शूटिंगचा अनुभव

कोरोना काळ हा कोणासाठीच सोपा नाही. याचाच प्रत्यय शुटींग दरम्यान अभिनेत्यानांही आला आहे. अभिनेत्री राधिका आपटेने हा अनुभव सांगितला आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 1 मे : सध्या कोरोनाचा कठीण (cororna pandemic) काळ संपूर्ण देशभरात सुरु आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन (Maharashtra Lockdown)  जाहीर करण्यात आला आहे. तर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी शुटींग ठप्प असलं तरीही काही राज्यांत शुटींगला परवानगी आहे. बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ने शुटींग दरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे.

कोरोना काळ हा कोणासाठीच सोपा नाही. याचाच प्रत्यय शुटींग दरम्यान अभिनेत्यानांही आला आहे. राधिका आपटेने काही दिवसांपूर्वीच ‘मिसेस अंडरकव्हर’ (Misses Undercover) या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी राधिकाने कोलकत्यामध्ये चित्रपटाचे 45 दिवसांचे चित्रिकरण पूर्ण केले होते. पण हे करताना तिला अनेक कठीण अनुभवांना सामोरं जावं लागलं.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिका म्हणाली, “अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे विविध प्रकारची सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही आधी सारखेच होते.”

सई ताम्हणकरचा Western अवतार; पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचं Bold फोटोशूट

पुढे राधिका म्हणाली, ‘राहण्याच्या हॉटेलपासून शुटींगच्या लोकेशनपर्यत इतकाच काय तो आवश्यक प्रवास करण्यात आला चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या. बाकी सगळी काळजी घेण्यात आली.’

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या आगामी चित्रपटांची , वेबसीरिजची माहिती देत असते. ‘मिसेस अंडरकव्हर’ सह अन्य चित्रपटांतही ती दिसणार आहे. त्यांची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. राधिका ला तिच्या वेबसीरिज मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. नुकतीच राधिकाची 'ओके कम्प्युटर' ही वेबसिरिज आली होती. त्यातील तिच्या कामाचं कौतुक झालं होतं. काही नव्या वेबसीरिज मध्येही ती दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Lockdown