Home /News /entertainment /

जेव्हा ‘काशीबाई’ला 'मस्तानी'च्या रोलबद्दल विचारलं जात; पाहा प्रियंका चोप्राने काय दिलं उत्तर

जेव्हा ‘काशीबाई’ला 'मस्तानी'च्या रोलबद्दल विचारलं जात; पाहा प्रियंका चोप्राने काय दिलं उत्तर

“तुम्ही चित्रपट पाहिलात का?” माझं घर पहा गार्डन बनलं आहे”. काशीबाईने म्हणजेच प्रियंकाने प्रश्न करणाऱ्याला दिलं उत्तर.

  मुंबई, 11 एप्रिल : ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) या 2015 साली आलेल्या चित्रपटाने तूफान लोकप्रियता मिळवली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र विशेष गाजलं होतं. अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka chopra Jonas) ने काशिबाईंच पात्र साकारलं होतं, तर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने मस्तानीचं पात्र साकारलं होत. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेत होता. तिघांच्याही कामाचं पूरतं कौतुकही झालं होतं. पण आता या चित्रपटाशी निगडीत एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रियंकाला तिच्या रोल विषयी विचारण्यात आलं. तुम्ही काशिबाईंचा रोल केला पण “जेव्हा तुम्हाला स्क्रिप्ट मिळाली तेव्हा तुम्ही मस्तानीच्या रोल साठी आग्रह धरला होता का ?”  तेव्हा प्रियंकाने त्यावर तिच्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. तिने प्रश्न करणाऱ्यालाच प्रश्न केला आणि “तुम्ही चित्रपट पाहिलात का?”  असं विचारलं. त्यावर त्याने ‘हो’ असं म्हटलं. “मग मी का केला नसता, काशी आवडली?, माझं घर पाहा गार्डन बनलं आहे”. अशा शब्दात काशीने अर्थातच प्रियंकाने त्या प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर दिलं.
  Priyanka being asked if she’d ever insisted on doing Deepika’s role in BM 😭😭😭😭 what a perfect response lol from r/BollyBlindsNGossip
  प्रियंकाच्या कामाचं फार कौतुक झालं होतं, त्यामुळे तिच्या घरी अनेक फुलांचे गुच्छ आले होते व घर एखाद्या बगीच्या प्रमाणे दिसत होत. त्यावेळी प्रियंकाने शुटींगच्या दरम्यान एक ट्विट देखील केलं होतं. त्यात तिने ती शुटींग दरम्यान किती थकत होती हे सांगितलं होतं ते ट्विट देखील पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

  (वाचा - श्रेया घोषाल लवकरच होणार आई; बाळाच्या स्वागतासाठी करतेय अशी तयारी)

  प्रियंका सध्या बॉलिवूड (Bollywood)  मध्ये जास्त सक्रिय नसली, तरीही हॉलिवूड (Hollywood) मध्येही तिने चांगल नाव कामावलं आहे. तर पती निक जोनस सोबत विवाह केल्यानंतर ती आता अमेरीकेतच जास्त वेळ घालवते. नुकतचं प्रियंकाने तिने लिहीलेलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या