देसी गर्लची हॉलिवूड इनिंग सुस्साट; मॅट्रिक्स 4 नंतर ‘या’ हॉलिवूडपटाची ऑफर

देसी गर्लची हॉलिवूड इनिंग सुस्साट; मॅट्रिक्स 4 नंतर ‘या’ हॉलिवूडपटाची ऑफर

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ची हॉलिवूड इनिंग दणक्यात सुरू आहे. मॅट्रिक्स 4 (matrix 4)चं शूटिंग सुरू असतानाच तिला आणखी एक हॉलिवूडपटाची ऑफर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:ची खास ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियांका एका नव्या हॉलिवूड मुव्हीमध्ये झळकणार आहे. या फिल्ममध्ये प्रियांका सेलीन डिऑन (Celine Dion )सोबत काम करणार आहे. सेलीन डिऑनने आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा ग्रॅमी  अ‍ॅवॉर्ड मिळवला आहे. प्रियांकाने नुकतच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. प्रियांकाच्या नव्या हॉलिवूड मुव्हीचं नाव टेक्स्ट फॉर यू (text For You) असं आहे. ही मुव्ही एसएमएस फर डिच (SMS Fur Dich)या जर्मन मुव्हीवर आधारित आहे. 2016 साली जर्मन सिनेमा रीलिज झाला होता.

प्रियांकाने इन्टाग्रामवरुन दिली माहिती

प्रियांकाने इन्टाग्रामवर आपल्या नव्या सिनेमाबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, "अनेक मोठ-मोठ्या कलाकारांसोबत मी या सिनेमात काम करणार आहे. शूटिंगला सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे. एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणं हा माझा सन्मान आहे." त्यावर प्रियांकाचा नवरा निक जोनसनेही एक इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तिचे भारतीय फॅन्स तिला बॉलिवूडमध्ये परत कधी काम करणार असे प्रश्न विचारत असतात. पण प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये रमली आहे असंच दिसत आहे.

मॅट्रिक्स 4च्या शूटिंगमध्ये प्रियांका व्यस्त

सध्या प्रियांका चोप्रा मॅट्रिक्स 4 सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. या हॉलिवूडपटाचं शूटिंग सध्या बर्लिंनमध्ये होत आहे. कोरोनामुळे शूटिंगचं शेड्यूल पुढे ढकलण्यात आलं होतं. प्रियांका 2019मध्ये ‘द स्काय इज पिंक’ या बॉलिवूड मुव्हीमध्ये झळकली होती. यामध्ये फरहान अख्तर, झायरा वसीम, रोहित सुरेश सराफ हे कलाकारही दिसून आले होते.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 28, 2020, 5:08 PM IST

ताज्या बातम्या