मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /स्वतःच्याच रेस्टॉरंटमधे बनवत होती खाद्यपदार्थ अन्...; पाहा प्रियांकाचा तो व्हायरल VIDEO

स्वतःच्याच रेस्टॉरंटमधे बनवत होती खाद्यपदार्थ अन्...; पाहा प्रियांकाचा तो व्हायरल VIDEO

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली बॉलिवूडप्रि. अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायमच चर्चेत असते. आई झाल्यापासून ती सध्या तिचं आईपण एन्जॉय करताना दिसते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 ऑक्टोबर : सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली बॉलिवूडप्रि. अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायमच चर्चेत असते. आई झाल्यापासून ती सध्या तिचं आईपण एन्जॉय करताना दिसते. मुलगी मालतीसोबत क्वालिटी टाईम घालवतानाचे अनेक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र यावेळी प्रियांका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या चाहत्यांसोबत एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिच्या चाहत्यांना सोना  रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात घेऊन जाते, जिथे ती तिच्या वेटर्सना काही गरम कबाब आणि इतर काही गोष्टी बनवण्यास मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रियांकाला स्वयंपाक करताना पाहून चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकानं पोस्ट शेअर करत म्हटलं, 'सोना बिहाइंड द सीन्स फ्रॉम किचन ऑफ न्यूयॉर्क... खरं सांगायचं तर मला खूप गोष्टी आवडतात. सर्व स्वादिष्ट जेवणासाठी @harrynayak आणि @harry.nair यांचे आभार. प्रियांका न्यूयॉर्कमधील फ्लॅटिरॉनमध्ये सोना नावाचे भारतीय रेस्टॉरंट चालवते. यामध्ये भारतातील अनेक लोकप्रिय पदार्थ मिळतात. तिच्या रेस्टॅरंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, प्रियांका तिच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा महिलांवर आधारित चित्रपट 2011 मध्ये आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा बॉलिवूडमधे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Hollywood, Priyanka chopra