Home /News /entertainment /

‘काळ्या चेहऱ्यामुळं मिळत नव्हतं काम’; फॅमेली मॅनच्या पत्नीनं केलाय वर्णद्वेषाचा सामना

‘काळ्या चेहऱ्यामुळं मिळत नव्हतं काम’; फॅमेली मॅनच्या पत्नीनं केलाय वर्णद्वेषाचा सामना

‘निर्माते म्हणायचे मी काळी दिसते’; अभिनेत्री प्रियमणीनं सांगितला वर्णभेदाचा अनुभव

    मुंबई 13 जून: वर्णद्वेष ही गेली अनेक शतकं सुरु असलेली समस्या आहे. (colourism) अगदी अद्यायावत तंत्रज्ञानानं सजलेल्या युरोप-अमेरिकेतही कृष्णवर्णीय मंडळी या समस्येचा दररोज सामना करतात. अगदी अलिकडेच काही महिन्यांपूर्वी या वर्णद्वेषाविरोधात (Racism) अमेरिकेत एक आंदोलन केलं गेलं होतं. अन् त्याचे पडसाद भारतातही उमटले. अनेक नामांकित सेलिब्रिटींनी रंगावरुन चिडवल्या गेल्याचे अनुभव सांगितले. असाच एक थक्क करणारा अनुभव प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी (Priyamani) हिनं सांगितला आहे. अभिषेक बच्चन आईला घाबरतो की बायकोला? बहिणीनंच केली भावाची पोलखोल प्रियमणी सध्या द फॅमिली मॅन (The Family Man) या सीरिजमुळं चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्तानं बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिनं वर्णद्वेषाचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “लोक म्हणायचे मी काळी दिसते. माझा चेहरा गोरा आणि मात्र माझे पाय काळे दिसतात असं ते म्हणायचे. या लोकांना झालंय तरी काय. जरी माझा रंग उजळ नसला तरी मला फरक पडत नाही.  मी काळ्या रंगाची व्यक्ती असेलही तर तुमचे विचार बदला. काळ्या रंगाच्या व्यक्ती देखील सुंदर असतात. भगवान कृष्णदेखील काळेच होते आणि ते सुंदरही होते. तुमच्या मनात जरी असे विचार असतील तर किमान ते न बोलता मनातच ठेवा. उगाच कुणी जाडं आहे किंवा काळं आहे असं म्हणून नकारात्मकता पसरवू नका.” मुलाखत देताना अभिनेते दाढी का खाजवतात? सुनील ग्रोवरनं सांगितलं थक्क करणारं कारण यापुढे ती म्हणाली, “माझ्या त्वचेचा रंग गव्हाळ आहे. मी गोरी नाही. त्यामुळं करिअरच्या सुरुवातीस मला काम मिळत नव्हतं. काही जणांनी तर ऑडिशनमध्ये देखील उभं केलं नाही. शिवाय जी काही काम मिळायची ती मोलकरीण किंवा हिरोईनच्या शेजारी उभं राहायची. अर्थात ही काम करायला हरकत नव्हती पण माझा रंग उजळ नाही म्हणून मला अशा भूमिका दिल्या जात होत्या त्यामुळं मी त्रस्त होते.” असा थक्क करणारा वर्णद्वेषाचा अनुभव प्रियमणी हिनं सांगितला.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Crime, Entertainment, Web series

    पुढील बातम्या