सिनेमा वाचवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाशची सुप्रीम कोर्टात धाव!

काही सेकंदांच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झालेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 09:34 AM IST

सिनेमा वाचवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाशची सुप्रीम कोर्टात धाव!

20 फेब्रुवारी : काही सेकंदांच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झालेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. प्रिया प्रकाशचा 'ओरू अडार लव' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविरुद्ध सुरू असलेली कायदेशीर कारवाई थांबावी यासाठी प्रिया प्रकाशनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रिया प्रकाश हिच्या मल्ल्याळम 'ओरू अडार लव' या चित्रपटात तेलंगाना आणि महाराष्ट्रातील एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. प्रियाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील गाणं व्हायरल झाल्यानंतर सर्वात आधी तेलंगणामधील काही तरूणांनी चित्रपट निर्मात्यांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्यानंतर चित्रपट दिग्दर्शकांविरुद्धही गुन्हा दाखल केला. त्यामुळे नियमाप्रमाणे हाही सिनेमा धोक्यात आला आहे.

'ओरू अडार लव' हा चित्रपट येत्या ३ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणं 'मानिका मलयारा पूवी' नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रिया प्रकाशची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली आहे. या गाण्यानंतर प्रिया प्रकाशची इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या १० लाखापेक्षा अधिक झाली हे विशेष. पण काही क्षणात स्टार झालेली प्रिया सध्या तिचा सिनेमा वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 09:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close