मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड निघाली वारीच्या वाटेवर! हरिनामाच्या गजरात धरला ठेका

VIDEO: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड निघाली वारीच्या वाटेवर! हरिनामाच्या गजरात धरला ठेका

VIDEO: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड निघाली वारीच्या वाटेवर! हरिनामाच्या गजरात धरला ठेका

VIDEO: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड निघाली वारीच्या वाटेवर! हरिनामाच्या गजरात धरला ठेका

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हि नुकतीच पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली होती. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिनं शेअर केले आहेत.

  मुंबई, 24 जून:  महाराष्ट्रात एकीकडे राजकारण तापतलं तर दुसरीकडे भक्तांच्या मांदियाळीत आळंदी आणि पंढरपूर गजबजून गेलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात पंढरपूरची वारी ( Pandharpur Vari) होणार आहे. हरिनामाच्या गजरात अनेक भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत. मराठीतीली काही प्रसिद्ध कलाकारांनीही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीला हजेरी लावली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही (Prajakta Gaikwad) वारीच्या वाटेवर निघाली आहे. प्राजक्तानं वारकऱ्यांबरोबर पायी पारी करत हरिभजनाच्या गजरात ठेकाही धरलाय. प्राजक्तानं तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. प्राजक्ता पुण्यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती. तिथं तिनं तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर केला. इतकच नाही टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला. दोन वर्षांनंतर वारीचा पुरेपूर आनंद लुटताना प्राजक्ता दिसली.
  हेही वाचा - इंद्रा आहे जयश्रीचा दत्तक मुलगा? मालिकेत नव्या पात्राची एंट्री; पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट वारीत सहभागी होणाऱ्या प्राजक्तानं पारंपरिक वेश परिधान केला होता. जांभळ्या रंगाची इरकली साडी कपाळी काळा गंध आणि नारंगी टिळा लावून महाराष्ट्राच्या लेकीचा अभिमान मिरवताना प्राजक्ता दिसली. प्राजक्ताचा मराठमोळा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. 'वारीच्या वाटेवर या फोटोला कॅप्शनची गरज नाही. आतापर्यंतचा सगळ्यात भारी फोटो', असं कॅप्शन देत प्राजक्तानं तिचे वारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मराठमोळ्या प्राजक्ताचे वारीचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय. एका चाहत्यानं म्हटलंय, 'रखुमाई सारख्या दिसता. खरंच आतापर्यंतच्या आवडलेल्या फोटोंपैकी एक हा फोटो आहे'. तर दुसऱ्या चाहत्यानं म्हटलंय, 'खूप छान दिसताय ताईसाहेब'. प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी तिची प्रत्येक पोस्ट खास असते.  वारीच्या फोटोंवर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय.
  अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत अशाप्रकारच्या कार्यक्रमांना भेट देत असते. सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये प्राजक्ता फार प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सध्या टेलिव्हिजनवर कुठेही दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर फोटोशूट शेअर करत असते. नुकतीच प्राजक्तानं इंजिनीअरींगची परीक्षा दिलीय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या