Home /News /entertainment /

अभिनेत्री पूजा हेगडचं इन्स्टाग्राम हॅक, रात्री 1 वाजता चाहत्यांना केला 'हा' मेसेज

अभिनेत्री पूजा हेगडचं इन्स्टाग्राम हॅक, रात्री 1 वाजता चाहत्यांना केला 'हा' मेसेज

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडचं (Pooja Hegde) इन्स्टाग्राम अकाउंट बुधवारी हॅक झालं होतं.

    मुंबई, 28 मे : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडचं (Pooja Hegde) इन्स्टाग्राम अकाउंट बुधवारी हॅक झालं होतं. अकाऊंट हॅक झाल्याच कळल्यावर पूजा काहीशी अस्वस्थ झाली होती मात्र तिने तिच्या डिजिटल टीमच्या मदतीने तिचं अकाऊंट पूर्ववत करून घेतलं. Housefull 4 मधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या या अभिनेत्रीने रात्री उशिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेसंदर्भात माहिती दिली. पूजाने रात्री 1 वाजता ट्वीट करून तिचं अकाउंट हॅक झाल्यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये ती म्हणाली की 'मित्रानो, माझ्या टीमने मला माहिती दिली की माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. यासाठी माझी डिजिटल टीम माझी मदत करत आहे. या दरम्यान तुम्ही कोणतंही इंविटेशन स्वीकारू नका किंवा कोणतीही वैयक्तिक माहितीही देऊ नका, धन्यवाद'. वाचा-विद्या बालनं केलं होतं न्यूड फोटोशूट, लॉकडाऊनमध्ये व्हायरल झाले PHOTOS हे ट्वीट केल्यानंतर तासाभराने तिने आणि एक ट्वीट करत तिचे अकाऊंट रिकव्हर झालं असल्याची माहिती दिली. यामध्ये तिने असं म्हटलं होतं की, 'गेल्या तासभरापासून मला माझ्या इन्स्टाग्रामबाबत चिंता होती. माझ्या टेक्निकल टीममुळे काळजी मिटली आहे. शेवटी माझं इन्स्टाग्राम माझ्या हातात आहे. गेल्या तासाभरात जे मेसेज किंवा फॉलोबॅक पोस्ट केले आहेत ते हटवण्यात येतील'. वाचा-मुंबईहून बिहारला पोहोचली गर्भवती महिला, बाळाचं नाव ठेवलं 'सोनू सूद' वाचा-दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी रणवीर उधळत होता पैसे, वडिलांनी हिशोब विचारला आणि... हृतिक रोशनबरोबर 'मोहनजोदाड़ो' या सिनेमातूून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. लवकरच पूजा प्रभासबरोबर 'जान' या सिनेमात दिसणार आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Instagram

    पुढील बातम्या