मुंबई, 28 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून देशाभरातील वेगवेगळ्या ठिकाणी CAA आणि NRC विरोधात आंदोलनं केली जात आहेत. या विरोधी आंदोलनांना आता अभिनेत्री पूजा भटनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. नुकत्याच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना पूजानं नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.
दक्षिण मुंबईतील CAA-Nrcच्या विरोधआत सुरू असलेल्या आंदोलनाच्या एका कार्यक्रमात पूजा भट आणि अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना पूजा म्हणाली, ‘तुम्ही म्हणता ना ‘भारत माता की जय’ बोला. आमच्यातील प्रत्येक महिलेत एक आई दडलेली आहे आणि तुम्ही त्या आईला जागवलं आहे. भारत सरकारचे आभार की त्यांनी सर्वांनी आम्हाला झोपेतून जागं केलं. आज पूर्ण देश याच्या विरोधात आहे. युरोपियन संघ बोलतोय हे सर्व खोटे आहेत का ?’
शहांचा भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवणावर ताव, अभिनेत्रीला सुचला फिल्मी डायलॉग
Pooja Bhatt in Mumbai y'day: I implore our leaders to listen to the voices that have risen in the country. The women in India,at Shaheen Bagh&Lucknow...we'll not stop until we are heard loud&clear.I'd implore people to speak up more. I don't support CAA&NRC as it divides my house pic.twitter.com/Hm3TlJ3AdT
— ANI (@ANI) January 28, 2020
CAA-NRC माझ्या घराची फाळणी करतं
CAA-NRC विरोधी आंदोलनांचं समर्थन करताना पूजा भट म्हणाली, त्यांनी आपल्याला जागं होण्याचा संदेश दिला आहे. मी CAA-NRCला अजिबात पाठिंबा देत नाही. याच्यामुळे माझ्या घराची फाळणी होऊ शकते आणि जी गोष्ट माझ्या घराची वाटणी करु शकते त्या गोष्टीला मी कधीच पाठिंबा देत नाही.
दीपिका पदुकोणने केली पुढची घोषणा; Instagram स्टोरीमध्ये काय सांगितलं पाहा
पूजा भट पुढे म्हणाली, असं म्हटलं जातं की, बॉलिवूडमध्ये फक्त काही लोकच बोलतात. मला माहित आहेत सर्वजण बोलत नाहीत. सगळे घाबरतात. नेत्यांनो आमचं म्हणणं ऐका, शाहीन बाग ते लखनऊ पर्यंत आंदोलन करणाऱ्या महिलांचं बोलणं ऐका. या सरकारला माहित आहे की त्यांचे ऑडियन्स कोण आहेत. सोशल मीडियावरील लोकांना माझी विनंती आहे, घरात आग लागलीच आहे. त्यात आणखी पेट्रोल ओतू नका. जे विद्यार्थी याच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत त्यावरुन आपल्याला हे समजतं की आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
'आता काय दाखवायचं राहिलंय?' प्रियांकाचा ग्रॅमी लुक सोशल मीडियावर झाला ट्रोल