मुंबई, 20 जानेवारी : एका अपार्टमेंटच्या बाहेर तीन दिवसांपासून वर्तमान पत्र आणि दुधाच्या पिशव्यांचा ढिग पडला होता. त्या अपार्टमेंटला कोणीही बाहेरून कुलूप लावलं नव्हतं की घरातून कोणी बाहेर येऊन ते सामान आत घेत नव्हतं. तीन दिवस सुरू असलेला हा प्रकार इतर लोकांच्या लक्षात आला. ते घराजवळ गेले पण घरातून घाणेरडा वास येत होता. संशय आला आणि लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस त्या अपार्टमेंटला आले. बराच वेळ घराचा दरवाजा ठोठावला पण आतून कोणी हाक देईना. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तोच घाणेरड्या वासाचा भपका आला. पोलीस घरात शिरताच त्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री परवीन बाबी त्या खोलीत मृत अवस्थेत आढळली. तिचा मृतदेह सडला होता. घरात कोणीही उभं राहू शकत नव्हतं अशी परिस्थिती होती.
22 जानेवारी 2005साली अभिनेत्री परवीन बाबी हिचा मृत्यू झाला. तिच्या जुहू येथील एज रिवेरा बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये तिचा मृत्यदेह सापडला. मृतदेह सडला होता त्यातून दुर्गंधी येत होती. परवीन बाबी बेडवर पडली होती. तिला ओळखणंही कठीण झालं होतं. शरीर सडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या खोली श्वास घेणंही मुश्किल झालं होतं. तिच्या बेड शेजारी एक व्हिलचेअर देखील पडली होती. 72 तासांपूर्वी अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. पण ना कोणी नातेवाईक, ना मित्र , ना शेजारी. 3 दिवस परबीन बाबी मृतावस्थेत बेडरूममध्ये पडून होती
परवीन बाबीचा मृतहेद अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये परबीन बाबीच्या शरिरात अन्नाचा एक कणही मिळाला नव्हता. अभिनेत्री अनेक दिवस उपाशी होती. पण तिच्या शरिरात अल्कोहोलचं प्रमाण आढळलं होतं. रिपोर्टनुसार, परबीन बाबीनं मृत्यूच्या 3-4 दिवस आधी काही खाल्लं नव्हतं. भुकेनं तिच्या शरिरानं काम करणं बंद केलं होतं. परवीन बाबीचा पाया सर्वाधिक सडला होता. तिच्या पायांची बोटं काळी पडली होती. परवीन बाबीला हाय शुगर असल्यानं पायाला गँगरीन झालं होतं. पायाला इजा झाल्यानंच तिला चालत येत नव्हतं त्यामुळेच तिनं व्हिलचेअर घेतली होती.
22 जानेवारीला परवीन बाबीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर 23 जानेवारी 2005ला मृतदेह कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पोहोचला. परवीन बाबीच्या मृत्यूनंतर तिचे कोणी नातेवाईक तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णलयात आलं नाही. मृतदेह सापडून 2 दिवस झालं होते पण कोणीही त्याची दखल घेण्यासाठी तयार नव्हतं. अखेर फिल्ममेकर आणि परवीन बाबीचं नाव जोडलं गेलेले महेश भट्ट यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता. एकेकाळी परवीन बाबीच्या मानसिक परिस्थितीमुळे महेश भट्ट त्यांचा संसार सोडून आले होते. त्याच महेश भट्ट यांनी परवीन बाबीच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती.
हेही वाचा - Bharat Vyas : लेकाच्या विरहात लिहिलेलं गीत झालं प्रेमवीरांचं अजरामर गाणं
अभिनेत्री परवीन बाबीनं मृत्यूच्या काही महिन्याआधी धर्म बदलला होता. तिनं मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. तिच्यावर ख्रिश्चन धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जावे अशी तिची इच्छा होती. पण तिच्या मुस्लिम नातेवाईकांनी यासाठी विरोध केला आणि मुस्लिम पद्धतीनं तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
परवीन बाबीचा मृत्यू होऊन आज 18वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र 18 वर्षानंतरही तिचा जुहूतील तो फ्लॅट रिकामी आहे. त्या फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये आहे. तर महिन्यात भाडं 4 लाख रुपये. ई टाइम्सनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, लोक त्या फ्लॅटमध्ये राहण्यास घाबरतात. लोक फ्लॅट बघून जातात मात्र जेव्हा त्यांना कळतं की हा फ्लॅट परवीन बाबीचा असून इथे तिचा मृत्यू झाला होता तेव्हा ते नकार देतात. आजही तो फ्लॅट रिकामी आहे.
1983मध्ये परवीन बाबी मुंबईत आली. परबीनला पॅरानाइड सिजोफ्रॅनिया नावाचा आजार होता. पण तिनं कधीच यावर भाष्य केलं नव्हतं. इंडस्ट्रीतील लोक तिला मुद्दाम पागल म्हणून चिडवायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News