मुंबई, 13 जानेवारी: 2019 मध्ये परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) बरोबर 'जबरिया जोडी' (Jabariya Jodi) या सिनेमात दिसली होती. पण आता तब्ब्ल 2 वर्षानंतर परिणीती 'द गर्ल ऑन द ट्रेन' (The Girl On The Train) या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. परिणितीच्या या सिनेमाचं शूटिंग गेल्या वर्षीच पूर्ण झालं होत पण कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) हा सिनेमा जवळजवळ एक वर्षानंतर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं टिझर नुकतंच लाँच झालं असून परिणीतीचे चाहते सोशल मीडियावर (Social Media) या टिझर ला जोरदार पसंती दाखवत आहेत.
एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही हा चित्रपट सिनेमाघराणं ऐवजी थेट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि 'फक्त तिचा भूतकाळचं आता तिचा भविष्यकाळ वाचवू शकतो' असं गूढं कॅप्शन दिल आहे. टिझर बघून तरी हा सिनेमा उत्सुकतेने भरलेला रहस्यमय चित्रपट असल्याचं पुढे येत आहे.
तसेच परिणितीने हि तिच्या इंस्टाग्राम पेजवर या सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. ज्यावर काही तासातच तिच्या लाखो फॅन्स ने पसंती दाखवली आहे.
View this post on Instagram
तसेच या चित्रपटात परिणीती चोप्रा व्यतिरिक्त अभिनेत्री अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. The Girl On The ट्रेन चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ताने केले आहे.