Home /News /entertainment /

आईच्या उपचारासाठीही नाहीत पैसे; अभिनेत्रीने चाहत्यांसमोर पसरले हात

आईच्या उपचारासाठीही नाहीत पैसे; अभिनेत्रीने चाहत्यांसमोर पसरले हात

ही अभिनेत्री सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे, तिला तुमच्या मदतीचा हात हवा आहे.

  मुंबई, 08 मे : सध्या प्रत्येक जण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गरीब, गरजू आणि हातावर पोट असलेल्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावलेत. सेलिब्रिटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण आपाल्याला जमेल तितकी मदत करत आहेत. मात्र आता एक अभिनेत्रीच (actress) आर्थिक संकटात सापडली आहे. आपल्या आईच्या उपचारांसाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आता तिनं चाहत्यांसमोर मदतीसाठी हात पसरण्याची वेळ तिच्यावर आली आहे. अभिनेत्री नुपूर अलंकार (Nupur Alankar) सध्या आर्थिक संकटात आहे. आजारी आईवर उपचारासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. यासाठी तिनं क्राऊड फंडिंगचा मार्ग स्वीकारला आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून तिने आर्थिक मदत मागितली आहे. 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो', 'घर की लक्ष्मी बेटियाँ', 'स्वरागिनी' अशा टीव्ही सीरियल्समध्ये नुपूरने काम केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Nupur Alankar (@nupuralankar) on

  पीएमसी बँक घोटाळ्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नुपूरलाही बसला. बँकेतील अकाऊंट फ्रिज झालं, बँकेतून पैसेही काढता येईना, डेबिट कार्ड-क्रेडिट कार्ड काहीही वापरता येत नव्हतं, इतर बँकेतून कर्जही मिळत नव्हतं. घरात एक पैसा नव्हता, त्यामुळे घर चालवण्यासाठी नुपूरवर दागिने विकण्याची वेळ आली. तिनं आपल्या मित्रमैत्रिणींकडून उधारीवर पैसे घेतले होते, अशी माहिती तिने प्रसारमाध्यांना दिली होती.

  हे वाचा - बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन नुपूरची आई निशी चंद्रिका खट्टर आजारी आहे. त्यांना ILD हा फुफ्फुसाचा आजार आहे. याशिवाय मधुमेह, रुमेटाइड आर्थरायटिस, अँजायना (हृदयाची एक समस्या) देखील आहे. त्यांना 4 हार्ट अटॅकही येऊ गेलेत. त्या सध्या पूर्णपणे बेडवर असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. इतका पैसा आता उभा करायचा कसा असा प्रश्न नुपूरला पडला. त्यामुळे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून तिनं हा पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - पहले धंदा मर्द संभालते थे अब बचे नही; सुष्मिता सेनच्या वेबसीरिजचा ट्रेलर लॉन्च नुपूर म्हणाली, "आईच्या खर्चासाठी लागणारी ही रक्कम खूपच आहे. त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझ्या आईच्या उपचारासाठी तुम्हाला जितकी शक्य आहे तितकी मदत करा. तुमची ही मदत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे" नुपूरच्या आईवर उपचार करण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात सरसावत आहेत, मदत करणाऱ्यांचे नुपूरने आभार मानलेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
  Published by:Priya Lad
  First published:

  पुढील बातम्या