25 वर्षापूर्वी अशी दिसायची अभिनेत्री नीना गुप्ता, शेअर केला जुना फोटो

25 वर्षापूर्वी अशी दिसायची अभिनेत्री नीना गुप्ता, शेअर केला जुना फोटो

नीना गुप्ता यांनी नुकताच आपला 25 वर्षापूर्वीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नीना गुप्तांच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : अभिनेत्री नीना गुप्ताने आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही बऱ्याच अॅक्टिव्ह असतात.  त्या आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून त्यांच्या चित्रपटांविषयी माहिती देत असतात. चित्रपटातील विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटातील त्यांच्या पात्राला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. आयुष्यमानच्या शुभ मंगल सावधान या चित्रपटातही त्यांनी आयुष्यमानच्या आईची भूमिका साकारली होती.

हेही वाचा- दुसऱ्यांदा आई होण्यासाठी का घेतली सरोगसीची मदत, शिल्पा शेट्टीनं केला खुलासा

नीना गुप्ता यांनी नुकताच आपला 25 वर्षापूर्वीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नीना गुप्तांच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नीना गुप्ता यांनी नुकताच हेअर कट केला आहे. यानंतर त्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहेत.  नीना यांनी सोशल मीडियावर 25 वर्ष जुना फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “ 25 वर्षापूर्वीही मी केस कापण्याची हिम्मत केली होती."

 

View this post on Instagram

 

25 saal pehle bhi baal katne ki himmat ki thi

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

या फोटोत नीना यांचे केस छोटे दिसत आहेत. आणि तसचं त्यांनी काळ्या रंगाची रंगाची साडी नेसली आहे. नीना गुप्तांचा 25 वर्षापूर्वीचा हॉट आणि ब्युटीफुल अंदाज बघून चाहते घायाळ झाले आहेत. नीना गुप्तांच्या या फोटोवर चाहते दिलखुलासपणे प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा- प्रियांका-निकच्या शाही लग्नातील 'या' गोष्टीवर आहे सासूबाईंची नाराजी

नीना गुप्ता या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटानंतर त्यांच्या आगामी चित्रपट 'सुर्यवंशी' आणि रणवीर सिंगच्या '83' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाला चाहते चांगला प्रतिसाद देत आहेत. आता त्यांचे आगामी चित्रपट 'सुर्यवंशी' आणि '83' ला चाहते कसा प्रतिसाद देणार हे येणाऱ्या काळातच कळेल.

हेही वाचा- तीन लग्नं, दोन वेळा घटस्फोट, कामापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला अभिनेता

First published: February 23, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या