Home /News /entertainment /

VIDEO नीना गुप्ताने सांगितलं खरं दुःख; म्हणाल्या, 'विवाहित माणसाच्या प्रेमात कधी पडू नका'

VIDEO नीना गुप्ताने सांगितलं खरं दुःख; म्हणाल्या, 'विवाहित माणसाच्या प्रेमात कधी पडू नका'

‘बधाई हो’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यांसारख्या सिनेमातून घराघरामध्ये पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. दरम्यान नुकताच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अत्यंत खाजगी बाबीला हात घातला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत विवाहित माणसाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 3 मार्च : ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यांसारख्या सिनेमातून घराघरामध्ये पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नीना गुप्ता नेहमीच अॅक्टिव्ह असतात. वैयक्तिक तसेच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक घटना त्या आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान नुकताच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अत्यंत खाजगी बाबीला हात घातला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्यांच्या एका अफेअरबाबत भाष्य केलं आहे. नीना गुप्ता हा व्हिडीओमध्ये म्हणतात की, ‘तुम्ही हे डायलॉग्स खूप वेळा ऐकले असाल. तो तुम्हाला सांगेल की त्याचं आता त्याच्या पत्नीवर प्रेम नाही आहे आणि तो सध्या तिच्याबरोबर राहत नाही. तुम्ही त्याला सारखं विचाराल की मग तु तिच्यापासून वेगळं का नाही राहत. सध्या नको असं सांगत तो पुढे जात राहील. मग तुमच्या आशा वाढतात. सुरूवातीला काही वेळाच तुम्ही भेटता. त्यानंतर एखाद्या सुट्टीचा वगैरे प्लॅन करायचा असेल तर त्याला प्रॉब्लेम असतो. मग खोट बोलून तो तुमच्याबरोबर येतो. मग तुम्हाला त्याच्याबरोबर रात्र घालवायची असते. मग यामध्ये वाढ होऊ लागते. मग सहाजिकच तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं आहे, असं वाटू लागतं. मग तुम्ही त्याला गळ घालायचा प्रयत्न करू लागता की, त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यावा. ही गोष्ट तो वेगवेगळी कारणं देऊन टाळू लागतो. ज्याचा तुम्हाला त्रास देखील होतो आणि शेवटी तुमच्याशी लग्न करण्यास तो नकार देतो.’ (हे वाचा-'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लाँचमध्ये कतरिनाचा हॉट अंदाज, फोटो सोशल मीडियावर VIRAL) या व्हिडीओच्या शेवटी नीना गुप्ता यांनी लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्वत:चं उदाहरण देत असं न करण्याचा सल्ला त्यांच्या इन्स्टाग्राम फ्रेंड्सना दिला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्याला 'सच कहुँ तो' असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे.
  View this post on Instagram

  #sachkahoontoe

  A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

  सध्या नीना गुप्ता यांचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. यामध्ये नीना यांच्याव्यतिरिक्त आयुष्मान खुराना, जितेंद्र कुमार आणि गजराज राव यांच्या मुख्य भूमिका आहेत. आपल्या हटके भूमिकांसाठी नीना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या व्हिडीओनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुमारी माता झाल्या होत्या नीना गुप्ता नीना गुप्ता यांचं अभिनेता आलोक नाथ आणि पंडित जसराज यांचा मुलगा शारंगदेव या दोघांबरोबर जोडलं गेलं होतं. पण क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड यांच्याबरोबर त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली.  व्हिव्हियन रिचर्ड 70 आणि 80च्या दशकातील वेस्ट इंडिजचे गाजलेले बॅस्टमन! यावेळी भारत दौऱ्यावर असताना रिचर्ड आणि नीना गुप्ता यांची ओळख झाली. त्यावेळी रिचर्ड यांनी पत्नीशी घटस्फोट घेतला होता. दरम्यान, दोघांमध्ये दिवसेंदिवस जवळीक वाढत गेली. प्रेमात आकंठ बुडालेले दोघं भारताबाहेर देखील लंडन आणि अॅण्टीगुआ येथे भेटू लागले.
  शिवाय ज्यावेळी रिचर्ड मुंबईमध्ये येऊ लागले तेव्हा ते नीना यांच्या घरीच वास्तव्य करू लागले. एके दिवशी नीना गुप्ता यांनी मुंबईतील रूग्णालयामध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर नीना यांच्या कुमारी माता बनण्याची चर्चा सर्वत्र जोरात रंगली. पण, मुलीचे वडील कोण? याबद्दल मात्र त्यांनी अखेरपर्यंत मौन बाळगणं पसंत केलं. पण, काही काळानंतर नीना गुप्ता यांच्या मुलीचे वडील व्हिव्हियन रिचर्ड असल्याचं समोर आलं. रिचर्ड यांनी 25 वर्षानंतर ते नीना यांच्या मुलीचे बाप असल्याचं मान्य केलं. 8 वर्षांपूर्वी नीना यांनी सीए विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. विवेक यांनी सुद्धा आपल्या पत्नीशी घटस्फोट घेत नीना यांच्याशी लग्न केलं आहे, मात्र सध्या त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे. अन्य बातम्या सई ताम्हणकरच्या पायाला दुखापत, त्याच अवस्थेत करते आहे सिनेमाचं शूटिंग नीना गुप्ताच्या मुलीनं घेतला घटस्फोट, पती होता बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Neena gupta

  पुढील बातम्या