मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका, शेवट वेदनादायी होतो' नीना गुप्ता यांचा 'तो' VIDEO पुन्हा व्हायरल

'विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका, शेवट वेदनादायी होतो' नीना गुप्ता यांचा 'तो' VIDEO पुन्हा व्हायरल

नीना यांनी या व्हिडीओमध्ये मुलींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात न गुंतण्याचा सल्ला दिला आहे. नीना यांनी या व्हिडीओमध्ये आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत.

नीना यांनी या व्हिडीओमध्ये मुलींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात न गुंतण्याचा सल्ला दिला आहे. नीना यांनी या व्हिडीओमध्ये आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत.

नीना यांनी या व्हिडीओमध्ये मुलींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात न गुंतण्याचा सल्ला दिला आहे. नीना यांनी या व्हिडीओमध्ये आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत.

मुंबई, 20 मार्च : विविध आशयघन सिनेमांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणं अनेक दशकं सिद्ध केलेली अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रगल्भ आणि अनुभवी कलावंतांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. (neena gupta old viral video) नीना यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढउतार, खाचखळग्यांनी भरलेलं राहिलं आहे. विशेष म्हणजे या सगळ्याबाबत अजिबात संकोच न करता त्या अतिशय खुलेपणानं आपल्या भावना आणि मतं मांडत असतात. आता असाच एक मनोगत मांडणारा नीना यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (neena gupta shares her personal things)

या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलींना विवाहित पुरुषाच्या प्रेमात न गुंतण्याचा सल्ला दिला आहे. नीना यांनी या व्हिडीओमध्ये आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत. नीना या एकेकाळी साऊथ आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू व्हिवियन रिचर्ड्ससोबत नात्यात होती. रिचर्ड्स हे आधीपासून विवाहित होते. (neena gupta Vivian Richards story video)

व्हिवियनसोबत नीना यांचं नातं बरंच चर्चेत राहिलं. 1989 साली नीना यांनी लग्न न करताच मुलगी मसाबाला जन्म दिला. नीना यांनी दीर्घकाळ एकट्यानेच मुलीचं पालनपोषण केलं. 2008 साली व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक मेहरासोबत त्यांनी लग्न केलं. (neena gupta talks about falling love with married man)

(वाचा ‘शाहरुखमुळं आज मला गाता येतं’; शिल्पा शेट्टीनं सांगितला बाजीगरमधील किस्सा)

व्हायरल व्हिडिओ

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नीना समजावत आहेत, की विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडणं का योग्य नाही. त्या म्हणत आहेत, 'खरं सांगायचं तर काही असे डायलॉग्ज आहेत जे मी तुम्हाला ऐकवणार आहे.' (neena gupta love and marriage experiences)

घरी खोटं बोलून भेटता

त्या म्हणतात, 'आधी तुम्ही त्याच्या प्रेमात कैद होत जाता. तुम्हाला तो आवडू लागतो. त्याच्यासोबत तुम्ही वेळ घालवू लागता.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

मग तुमचे वीकेंड्सपण त्याच्यासोबत घालवण्याची तयारी करता. त्यालाही आपल्या घरी खोटं सांगून तुमच्यासोबत यावं लागतं.'

(वाचा 'अक्षय कुमारकडे आता 2-3 वर्षचं शिल्लक'; अभिनेत्याचं ट्विट होतंय व्हायरल)

लग्नावर येऊन गोष्ट अडकते

'अशाप्रकारे तुमच्या इच्छा आणि अपेक्षा वाढू लागतात. तुम्ही लग्नाची गोष्ट करता तेव्हा इथं चर्चा अडकते कारण त्याचं तर आधीच लग्न झालेलं असतं. त्यानं पत्नीपासून घटस्फोट घेणं, संपत्ती आणि बँक अकाउंट्स या सगळ्यांमुळे गोष्टी खूप गुंतागुंतीच्या झालेल्या असतात. शेवटी लग्नाचा प्लॅन रद्द होतो आणि शेवट वेदनादायी होतो.'

नीना गुप्ता सांगतात, 'की माझ्या अनुभवानुसार सांगायचं, तर सगळ्याच मुलींना मी सल्ला देईन की विवाहित व्यक्तीवर प्रेम करू नका. त्या म्हणाल्या, की मी हा सल्ला यासाठी देते आहे, की इतर कुणाला माझ्यासारखं भोगावं लागू नये.'

First published:
top videos

    Tags: Personal life, South africa, Viral video.