मुंबई, 13मार्च: अभिनेत्री आणि डिझायनर अशी ओळख असणऱ्या मसाबा गुप्ता (Masaba gupta) हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. महान क्रिकेटपटू विव्ह रिचर्ड्स (Viv Richards) शेजारी बसलाय आणि आई नीना गुप्ताच्या (Neena Gupta) मांडीवर झोपलेला एक लहानपणचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. त्यासोबत मिश्रवर्णीय असल्याचा अनुभव तिने शेअर केला आहे. त्यावर लिएंडर पेसपासून अनेक सेलेब्रिटींनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता (Masaba Gupta childhood photo viral) छोट्या मसाबाला मांडीवर घेऊन बसल्या आहेत. आणि त्यांच्या बाजूला त्यांचे पती आणि वेस्ट इंडीज चे क्रिकेटर विवियन रिचर्डस (Vivian Richards) त्यांना न्याहाळताना दिसत आहेत. या फोटोमध्ये नीना गुप्ता लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत खूपच तरुण आणि सुंदर दिसत आहेत. या फोटोच्या खाली मसाबाने अत्यंत भावनिक असं कॅप्शन सुद्धा लिहलं आहे. My Blood My World अशी कॅप्शन आहे. मसाबाच्या या पोस्टवर अनेक सेलेब्रेटींनी सुद्धा भावनिक कमेंट केल्या आहेत.टेनिसपटु लिआंडर पेस यांनी कमेंट देत म्हटलं आहे.'जिथे आपलं हृदय आपलं मनं आहे, तिथच आपलं घर आहे.' त्यांनतर अनिल कपूरची मुलगी रिहा कपूरनं हार्टच्या एमोजी शेअर करत मसाबाच्या पोस्टवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Bollywood News