आपल्याला कोरोना असल्याचं समजताच ढसाढसा रडली अभिनेत्री; VIDEO तून शेअर केला अनुभव

आपल्याला कोरोना असल्याचं समजताच ढसाढसा रडली अभिनेत्री; VIDEO तून शेअर केला अनुभव

कोरोनाचा रिपोर्ट आल्यानंतर ही अभिनेत्री रात्रभर रडत होती.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : आपल्याला कोरोनाव्हायरसची लागण झाली असं समजल्यावर आपली काय अवस्था होईल, अशीच काहीची अवस्था एका अभिनेत्रीची झाली. टिव्ही अभिनेत्री नव्या स्वामी (Navya Swamy) ला कोरोनाची लागण झाली आणि तिला फक्त धक्काच बसला नाही तर तिला रडूच कोसळलं. कोरोनाचा रिपोर्ट आल्यानंतर ती ढसाढसा रडली. रात्रभर ती रडत होती आणि आता तिने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ शेअर केला आहे.

नव्या स्वामी ही तेलुगु भाषेतील टिव्ही अभिनेत्री आहे. तिला सुरुवातीला डोकेदुखी होती आणि थकवा जाणवत होता. कोरोना टेस्ट केल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिला कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने तिची प्रतिक्रिया घेतली होती. त्यावेळी बोलताना  तिनं सांगितलं होतं की, "मी घरी घेल्यानंतर खूप रडली. सकाळपर्यंत रडत होती. मला रात्रीच झोपही लागली नाही. माझा फोन व्यस्त होता. रात्रभर मला व्हॉट्सअपवर मेसेज येत होते. मला खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं. मी माझ्या सहकलाकारांचं आयुष्यही धोक्यात टाकलं होतं"

आता तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

#staystrong #staypositive #donotpanic #covid19 #fightforcorona #gocoronago #fighttogether #morepower #thankful #navyaswamy

A post shared by Navya Swamy (@navya_swamy) on

या व्हिडीओत ती म्हणाली, "मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. जसं मला याबाबत समजलं तेव्हा मी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि स्वत:ला आयसोलेट करून घेतलं. मी आता औषधं घेत आहे. माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घेत आहे. मला मागील आठवड्यात भेटलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना मी आवाहन करते ही त्यांनीदेखील स्वत:ला आयसोलेट करून घ्यावं आणि कोरोना टेस्ट करून घ्यावी"

हे वाचा - महिनाभराच्या लढ्यानंतर अभिनेत्री कोरोनामुक्त; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

"यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही आणि घाबरण्याचीदेखील काहीच गरज नाही. मला माहिती आहे, लोकं खूप काही काही बोलतील. मात्र नकारात्मकतेपासन दूर राहा. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा मजबूतही राहाल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकर बरी होत आहे", असंही नव्या म्हणाली.

संपादन - प्रिया लाड

First published: July 2, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading