मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mrunmayee Deshpande: देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

Mrunmayee Deshpande: देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

देशपांडे सिस्टर्सचा स्पेशल व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा हसू आवरणं कठीण जाणार आहे एवढं नक्की.

देशपांडे सिस्टर्सचा स्पेशल व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा हसू आवरणं कठीण जाणार आहे एवढं नक्की.

देशपांडे सिस्टर्सचा स्पेशल व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा हसू आवरणं कठीण जाणार आहे एवढं नक्की.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना हसवत आल्या आहेत. सध्या या दोघींचा नवा व्हिडिओ सुद्धा असाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. यावेळी (mrunmayee deshpande gautami deshpande reels) देशपांडे सिस्टर्समध्ये चपलेवरून जोरदार वाद झाल्याचं दिसत आहे. भांडण तर आहेच पण एकीकडे व्हिडिओमध्ये मृण्मयी भांडणाच्या नादात एका नव्या फॅशन ट्रेंडला जन्म दिला आहे तो म्हणजे दोन पायात दोन वेगळ्या चपला घालणे. सहसा पायात चपलेचा सेम जोड असतो पण भांडणाच्या नादात असा एक निराळाच मिसमॅच ट्रेंड दोघीनी चालावला आहे. तर भानगड अशी आहे की मृण्मयीचा चपलेचा जोड परत द्यायला गौतमी नकार देत होती तर मृण्मयीने शक्कल लढवत तिच्या पायातून एक चप्पल आपल्या पायात काढून घेतली. आणि आता दुसऱ्या पायातली चप्पल मात्र वेगळी आहे असं दोघींच्याही बाबतीत झालं आहे. त्यामुळे एका चपलेचा एक जोड एका पायात आणि दुसऱ्याचा एक जोड असा मिसमॅच अवतार करून दोघी फिरताना दिसत आहेत.
यामध्ये गौतमी मात्र नाराज झाली असून मृण्मयीला मात्र मजा येताना दिसत आहे. याआधी सुद्धा असे अनेक व्हिडिओ दोघीजणी घेऊन आल्या आहेत. हे ही वाचा- Sonalee Kulkarni: 'किती वेळा लग्न करता'; सोनालीच्या वेडिंग स्टोरीने चाहते हैराण या दोन बहिणीचे हे कारनामे बघायला चाहत्यांना भलतीच मजा येते. प्रत्येक भाऊ बहिणीत घडणारा सेम प्रकार या दोघी बहिणींमध्ये घडत असल्याने एकदम आयुष्याला रिलेट होणार कनेटन्ट दोघी आपोआप बनवताना दिसतात.
एकमेकींना त्रास द्यायला त्यांना जितकी मजा येते तितकंच दोघींचं एकमेकींवर जीवापाड प्रेम सुद्धा आहे. दोघी नेहमीच एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतात. एकमेकांचं काम तितक्याच मनमोकळेपणाने स्वीकारून त्याला सपोर्ट करताना दिसतात.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या