मुंबई, 30 जून: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि बहिणींची जोडी म्हणजेच मृण्मयी
( Mrunmayee Deshpande) आणि गौतमी देशपांडे
( Gautami Deshpande) दोघीही बहिणी उत्तम अभिनेत्री आहेत. त्या दोघीही विविध माध्यमांतून चाहत्यांच्या भेटीस येत असतात. मृण्मयी आणि गौतमी सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. त्या एकमेकींसोबतचे फोटो आणि भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना पाहायला मिळतात. नुकताच मृण्मयीनं गौतमीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघी बहिणी व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम करणाऱ्या दोन्ही बहिणींना पाहून नेटकऱ्यांना मात्र गौतमीची दया आली आहे. भन्नाट कमेंट्स करत नेटकऱ्यांनी दोघींवर प्रेमाचा वर्षाव केलाय.
काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर करत म्हटलं होतं की, 'आरोग्याची काळजी घेत आपण नेहमी फिट राहिलं पाहिजे.' त्यामुळेच आता या देशपांडे बहिणी त्यांचा फिटनेस फंडा पाळत व्यायाम करताना, जिमच प्रशिक्षण घेताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पण खरं लक्ष वेधलंय ते या व्हिडीओखाली दोघींच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सने. गौतमीचे चाहते म्हणतायत की मृण्मयी जबरदस्तीने गौतमीला व्यायाम करायला भाग पाडतीये. गौतमी त्यामुळे नाखुशीने व्यायाम करत आहे. या दोघींच्या या नवीन फिटनेस व्हिडिओवर गौतमीचे चाहते नाराज दिसत आहेत. आता गौतमी स्वतःच्या मर्जीने व्यायाम करत आहे की मृण्मयीने खरंच तिच्यावर व्यायाम करण्यासाठी जबरदस्ती केली आहे हे तर फक्त या देशपांडे बहिणीच सांगू शकतील.
हेही वाचा -
Aai Kuthe Kay Karte: देशमुख कुटुंबावर नवं संकट; यशवर लागणार खुनाचा आरोप?
खरंतर या दोघी बहिणी नेहमी खोड्या, मजा मस्ती करताना पाहायला मिळतात. त्या एकमेकींसोबतचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी एकमेकींसोबतचे भांडणाचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरून शेअर केलेले आहेत. देशपांडे बहिणींच्या आंबट गोड नातं चाहत्यानांही आवडतं.
अभिनेत्री मृण्मयीच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर मृण्मयी नुकतीच चंद्रमुखी या सिनेमात दिसली होती. सिनेमात तिनं साकारलेली दमयंती दौलतराव देशमाने उर्फ डॉलीनं सर्वांची मनं जिंकली. तिच्या या भूमिकेचं सर्वांनी कौतुक केलं. मृण्मयीसाठीही ही भूमिका खास होती. तिनं आतपर्यंत केलेल्या भूमिकेपैकी तिची ही आवडती भूमिका होती असं तिनं म्हटलं होतं.
तर अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर गौतमी माझा होशील ना या मालिकेनंतर टेलिव्हिजनपासून दूरच आहे. सोशल मीडियावर मात्र ती सक्रीय असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.