• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मृणाल कुलकर्णींना ‘अशी’ हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी

मृणाल कुलकर्णींना ‘अशी’ हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी

मृणाल यांनी सुनेविषयी असलेल्या आपेक्षांविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर चक्क विराजस समोरच त्यांना त्यांच्या अटी मांडल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई 9 मे : अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचा (Mrunal Kulkarni) मुलगा विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे आता नवं नाव राहील नाही. विराजस सध्या झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na)  या मालिकेत काम करत आहे. तर मालिकेतील सई आणि आदित्य ही जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे सई हे पात्र साकारत आहे. तर विराजसचाही चाहता वर्ग हा दिवसेंदिवस वाढत आहे. विराजसची आई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी देखील काही चित्रपटांतून प्रेश्रकांच्या भेटीला येताना दिसतात. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मृणाल यांनी त्यांच्या सुनेविषयी असलेल्या आपेक्षांविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर चक्क विराजस समोरच त्यांना त्यांच्या अटी मांडल्या आहेत.
  होणारी सून कशी असावी व नक्की काय अटी आहेत असं विचारल्यानंतर मृणाल म्हणाल्या, सुरुवातीला त्यांनी काही मजेशीर उत्तर दिली. नंतर त्या म्हणाल्या,  “मुलीने मला चालून दाखवावं म्हणजे ती लंगडी आहे की नाही मला कळेल, तिने मला तांदूळ निवडून दाखवावेत म्हणजे तिची दृष्टी कशी आहे कळेल. तिने गाणं म्हणून दाखवावं.” असं त्या गमतीत म्हणाल्या व हसल्या.

  ‘...म्हणून गौरी मला अधिक जवळची वाटते’; गिरीजानं सांगितलं आपल्या आईचं गुपित

  पुढे त्यांनी म्हटलं, “माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे. आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू.” असं मृणाल म्हणाल्या. त्यामुळे विराजसची पसंत तीच माझी पसंत अस मृमाल म्हणाल्या.
  Published by:News Digital
  First published: