अक्षय कुमारची 'ही' अभिनेत्री नवाझुद्दीनच्या सिनेमातून बाहेर, निर्मात्यांनी केले आरोप

अक्षय कुमारची 'ही' अभिनेत्री नवाझुद्दीनच्या सिनेमातून बाहेर, निर्मात्यांनी केले आरोप

काही दिवसांपूर्वीच 'बोले चुडिया'या सिनेमाची घोषणा झाली होती. यासोबतच या सिनेमाचा फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 1 जून : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यामध्ये गणला जातो. लवकरच तो त्याचा आगामी सिनेमा 'बोले चुडिया'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात सुरुवातीला अभिनेत्री मौनी रॉयचं नाव फायनल करण्यात आलं होतं. मात्र आता निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर मौनीनं हा सिनेमा सोडला असून आता निर्माते नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. सिनेमाचे निर्माते, राजेश भाटिया यांनी याविषयीची माहिती प्रसार माध्यमांना देताना मौनीवर ती गैरजबाबदार असल्याचा आरोपही केला आहे.

'बोले चुडिया' सिनेमाचे निर्माते, 'राजेश यांनी सांगितलं, मौनी आता आमच्या सिनेमाचा भाग नाही आणि आता आम्ही एक नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहोत. या सिनेमाच्या तारखा कन्फर्म झाल्यानंतर मौनी या तारखा दुसऱ्या प्रोजेक्टला देऊ इच्छित होती. ती स्क्रिप्टमध्येही लक्ष देत नसून तिचा व्यवहारही अनप्रोफेशनल आहे. ती जबरदस्तीनं वर्कशॉप आणि रीडिंगसाठी हजर राहिली होती. त्यामुळे तिचं एकंदर वागणं पाहता आम्हाला तिला रिप्लेस करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.'

मौनीनं अद्याप या प्रकणावर आपली कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र तिच्या प्रवक्त्यानं मात्र मौनीनं हा सिनेमा सोडला असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, मौनीनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि तिचं आतापर्यंतचं करिअरही यशस्वी राहिलं आहे. तर दुसरीकडे राजेश भाटियांचा हा केवळ दुसरा सिनेमा आहे. त्यांचा पहिला सिनेमा वादात अडकला होता. त्यांनी एका अभिनेत्यावर सिनेमामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला असून आता ते मौनीवर ती प्रोफेशनल नसल्याचा आरोप करत आहेत. पण आमच्याकडे अनेक मेल आणि मेसेज आहेत जे मौनीला निर्दोष सिद्ध करू शकतात. पण या प्रकरणावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही. कोणीही समजदार व्यक्ती हे काय होत आहे हे समजू शकते.

काही दिवसांपूर्वीच 'बोले चुडिया'या सिनेमाची घोषणा झाली होती. यासोबतच या सिनेमातील नवाझुद्दीन आणि मौनीचा फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला होता. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहे. याशिवाय राजकुमार रावच्या 'मेड इन चायना'ध्येही मौनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 30 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

First published: June 1, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading