मुंबई, 08 मार्च : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीनाक्षी राठोड. अभिनेत्रीनं साकारलेली देवकी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मीनाक्षीनं प्रसुतीच्या कारणानं मालिकेतून एक्झिट घेतली असली तरी प्रेक्षक आजही तिची आठवण काढतात. मीनाक्षीला छोटी मुलगी झाली आहे. मीनाक्षी आणि तिचा नवरा अभिनेता कैलास वाघमारे दोघेही लेकीचं उत्तमरित्या पालनपोषण करत आहेत. लेकीचं नाव तिनं यारा असं ठेवलं आहे. मीनाक्षी सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव्ह असते. लेकीबरोबर अनेक फोटो व्हिडीओ ती शेअर करत असते. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल देखील आहे.
आज महिला दिनानिमित्त प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलेविषयी मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे. अभिनेत्री मीनाक्षीनं मात्र तिच्या नवऱ्यासाठी अभिनेता कैलाससाठी पोस्ट लिहिली आहे. मीनाक्षीनं नवऱ्याला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्यातील स्त्रीचं वारंवार कौतुक करावं असं वाटतं असं देखील तिनं म्हटलं आहे. मीनाक्षीची पोस्ट नेमकी काय आहे ? आणि तिनं नवऱ्याबद्दल असं का म्हटलंय. पाहूया.
हेही वाचा - Video : अभिनेत्री दमून घरी आली, दूध गरम करायला गेली अन् घडलं असं काही...
मीनाक्षीनं सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्यात लेक यारा आणि नवरा कैलास आहे. यारा बेबी बाऊंसरमध्ये बसली असून कैलास तिला जेवण भरवत आहे. या फोटोवरखाली लिहिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
मीनाक्षीनं म्हटलंय, "कॅालेज पासून माझी कधीच girl - friendनव्हती. जे काही गॉसिप होतं ते तुझ्यासोबतच केलं. माझ्यातल्या स्त्रीला मैत्रीण बनून अनेक पैलू पाडलेस आणि आता याराची आई होऊन तिला घडवतोयस. मायने दिलेली संस्काराची शिदोरी बेमालूमपणे आमच्या वर रीती करत जातोस. माझ्या माघारी डोळ्यात तेल घालून याराला मोठं करतोस . तुझ्यातल्या स्त्रीचं वारंवारं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला षुरूषासारखं बिनधास्त कामावर पाठवणाऱ्या माझ्या मैत्रीणी तुझ्यातलं बाईपण आमच्या दोघीत झिरपत राहो"
अभिनेत्री मीनाक्षीनं सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका सोडल्यानंतर बाळासाठी काही महिन्यांचा ब्रेक घेतला होता. यारा मोठी झाल्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली आहे. नुकतंच तिनं घर देखील शिफ्ट केलं आहे. मीनाक्षी सध्या अबोली मालिकेत काम करतेय. मालिकेत ती नीता हे पात्र साकारत आहे. शुटींग आणि घर जवळ असल्यानं ती कधी लेकीला घेऊन सेटवर देखील जाते. पण कैलास घरी असल्यावर तो पूर्णवेळ याराची काळजी घेतो. नवऱ्यामुळे मीनाक्षी 8 महिन्याच्या बाळाला सोडून बिनधास्त शुटींगला जाऊ शकते. सेटवरचे यारा आणि कैलासबरोबरचे अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडीओ देखील ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. मीनाक्षीनं नवऱ्यासाठी लिहिलेल्या पोस्टचं सर्वांना कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial