Home /News /entertainment /

VIDEO: मी तर रोज रडतेय पण..., नैराश्याबाबत अभिनेत्री मयुरी देशमुखने साधला संवाद

VIDEO: मी तर रोज रडतेय पण..., नैराश्याबाबत अभिनेत्री मयुरी देशमुखने साधला संवाद

शीतल (Sheetal Amte) ताईची बातमी ऐकून अस्वस्थ झाले. अशी भावना व्यक्त करत असतानाच अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) नैराश्यासारख्या गंभीर विषयावरील आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

  मुंबई, 02 डिसेंबर: शीतल आमटे (Sheetal Amte) यांची आत्महत्या सर्वांच्याच काळजाला चटका लावून जाणारी होती. त्या कौटुंबिक वादाच्या तणावामध्ये होत्या. नैराश्य, ताणतणाव हा आजकाल गंभीर विषय होत चालला आहे. आपल्या समाजातल्या मानसिकतेमुळे आपण अनेकदा नैराश्याकडे दुर्लक्ष करतो. किंवा नैराश्यात असलेल्या व्यक्ती फारच एकट्या पडतात. अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) यावर गंभीर विषयाला हात घालत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात मयुरी म्हणते, ‘शीतल आमटे यांची न्यूज ऐकून मी फार अस्वस्थ झाले. काही आठवड्यांपूर्वी माझी आणि शीतल ताईची फेसबुकवरुन ओळख झाली होती. आधीची कोणतीही ओळख नसताना ती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली होती. काही महिन्यांपूर्वी मी आशुतोषला (मयुरीच्या नवऱ्याला) शीतल ताईचा एक व्हिडीओ दाखवला होता. आम्हाला तिचं खूप कौतुक वाटलं होतं. आपल्या समाजात नैराश्य या विषयाला अजूनही गंभीरपणे घेतलं जात नाही. पण तुम्हाला जर तणाव किंवा नैराश्य जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. मी तर रोज रडतेय पण मी माझ्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधते. आपण दु:खी आहोत हे आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगण्यासाठी कमीपणा वाटून घेऊ नका. या भावना व्यक्त करणाचं धाडस तुमच्यात असेल तर तुम्ही स्ट्रॉंग आहात.’
  ‘एक समाज म्हणून आपण ताकद आणि सहनशीलता या व्याख्यांना खूप चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं आहे. मुलांनी रडायचं नाही, सगळी संकटं एकट्याने पेलायची, समाजातल्या मोठ्या व्यक्तींवरही हा भार आपण टाकतो. पण ते बदलणं खूप गरजेचं आहे. अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठीच घातक ठरते आहे. मयुरी पुढे म्हणते,  'आशुतोष गेल्यानंतर मला अनेक लोकांचे सोशल मीडियावरुन मेसेज आले. त्यातल्या 99 टक्के मी ओळखतही नाही. पण त्यांच्या मेसेजमुळे मला धीर मिळाला. त्यांच्याकडून मिळालेल्या उर्जेमळेच मला पुन्हा काम करण्याचं बळ मिळालं.’
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Health, Marathi entertainment

  पुढील बातम्या