S M L

45 वर्षीय मंदिराने साडीमध्ये मारले पुश-अप्स! व्हिडिओ व्हायरल

Renuka Dhaybar | Updated On: Feb 13, 2018 01:34 PM IST

45 वर्षीय मंदिराने साडीमध्ये मारले पुश-अप्स! व्हिडिओ व्हायरल

13 फेब्रुवारी : अभिनेत्री मंदिरा बेदी नेहमीच तिच्या फिटनेसकडे जास्तीत जास्त लक्ष देताना दिसते. आताही मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. मंदिराने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती चक्क साडी नेसून पुश-अप्स मारताना दिसतेय.

मंदिराने नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि याचदरम्यान तिला साडीमध्ये पुश-अप्स मारण्याचे आव्हान देण्यात आलं होतं. मंदिराचा साडीमध्ये पुश-अप्स मारतानाचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर तिचं भरभरुन कौतुक केलं जात आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना मंदिराने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही काय घातलंय यापेक्षा गोष्ट पूर्ण करणं महत्त्वाचं असतं,' असा प्रोत्साहनात्मक मेसेज लिहिला. ४५ वर्षीय मंदिराच्या या कृत्याचे अनेकांनी भरभरून कौतुक केले. मंदिराचे वर्क आऊटचे आणि अॅब्जचे फोटो पाहिले तर कोणीही तिचे वय ४५ वर्ष असल्याचे मान्य करणार नाही.

 

Loading...

When the attire didn’t matter.. the business had to be done!! 😂 #aboutlastnight #ilovemyjob #pushups in a #saree !

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 01:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close