दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

मुंबईत साखळी बॉम्ब हल्ल्यानंतर आरोपी म्हणून दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं. त्यानंतर मंदाकिनीचं नाव दाऊदसोबत जोडल्या गेल्यामुळे तिचीही चौकशी करण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 08:56 AM IST

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

मुंबई, 30 जुलै : यास्मीन जोसेफ हे नाव उच्चारल्यावर कदाचित तुम्हाला आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय हे कळणार नाही. पण जर मंदाकिनी हे नाव घेतलं तर लगेच ती अभिनेत्री आठवेल. आज मंदाकिनीचा 50 वा वाढदिवस. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे मंदाकिनीशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडत गेल्या की यश ज्या वेगाने मिळालं त्याच वेगाने ते निघूनही गेलं.

1985 मध्ये आलेल्या 'राम तेरी गंगा मेली' सिनेमातून मंदाकिनी यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आर.के. बॅनरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे हिरो होते राज कपूर यांचा भाऊ राजीव कपूर तर अभिनेत्री होती 16 वर्षांची मेरठची मंदाकिनी.

VIDEO मलायकावरच्या प्रेम अर्जुननं असं केलं जाहीर? टॅटूचा फोटो VIRAL

Loading...

 

View this post on Instagram

 

Happy birthday Charming!!! God bless forever and always!!!! Lots of love!!! 💐🎂✨🎊🎉🎁💖✨💖😍😘💖 #Mandi #Mandakini #Simplybeauty #charming #adorable #actress #favorite #love #beautiful #eyes 👁‍🗨

A post shared by ✨ Marina ✨ (@marina_ravina) on

पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. एका रात्रीत मंदाकिनी हे नाव देशभरात प्रसिद्ध झालं होतं. या सिनेमाने मंदाकिनीला त्या सर्व गोष्टी दिल्या, ज्याची इतर अभिनेत्रींना आयुष्यभर आस असते. या सिनेमानंतर मंदाकिनीकडे सिनेमांच्या ऑफरची रांग लागली होती.

तुमच्या पार्टीच्या खर्चापेक्षाही जास्त आहे प्रियांकाच्या बर्थडे केकची किंंमत!

1985 ते 1990 या पाच वर्षात मंदाकिनीने मिथुन चक्रवर्तीसोबत 'डांस डांस', गोविंदासोबत 'प्यार करके देखो' आणि अनिल कपूरसोबत 'तेजाब' अशा हिट सिनेमांत काम केलं. 1990 नंतर मात्र सगळी गणितं बदलली. या काळात तिचं नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं. वृत्तपत्रात मंदाकिनी आणि दाऊदच्या नात्याबद्दल रकानेच्या रकाने लिहिले जाऊ लागले. जर दिवशी त्यांचे फोटो छापले जात होते. या सगळ्यात मंदाकिनीने कधीच त्यांच्यातील प्रेमसंबंध मान्य केले नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असेच ती बोलत राहिली.

 

View this post on Instagram

 

#mithunchakraborty #mandakini

A post shared by Rani Mukerdjee Chopra (@ranimukerdjee) on

12 मार्च 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्ब हल्ले घडवण्यात आले. या हल्ल्याचा मुख्य आरोपी म्हणून दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं. या तपास कार्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली. पण एव्हाना मंदाकिनीचं नाव दाऊदसोबत जोडल्या गेल्यामुळे तिचीही चौकशी करण्यात आली होती. तेव्हा असं म्हटलं जायचं की दाऊद आणि मंदाकिनीने लग्न केलं असून त्यांना दोन मुलंही आहेत. पण याबद्दल दाऊदने आणि मंदाकिनीने कधीच कोणतं स्पष्टीकरण दिलं नाही.

भरत जाधवला मिळाली 'या' विनोदाच्या बादशहाची साथ आणि...

============================================================

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 08:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...