मुंबई, 9 जुलै- अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सध्या आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. मानसी नाईक पडद्यापासून दूर असली तरी, ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. मानसी सतत आपले फोटो किंवा व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सतत आपल्या पतीसोबत रील करताना दिसून येते. मात्र आजचा रील थोडा खास आहे. कारण यामध्ये तिने चक्क आपली आज्जी सासू आणि सासूसोबत मिळून धम्माल केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच आपल्या अदांनी आणि डान्सने चाहत्यांना वेड लावते. सोशल मीडियावर सतत मानसी डान्स व्हिडीओ शेयर करत असते. मानसी एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिच्या प्रत्येक व्हिडीओला चाहते दाद देत असतात. तसेच तिच कौतुकदेखील करत असतात. मात्र यावेळी मानसीसोबत तिची सासू आणि आजीसासूदेखील धम्माल करताना दिसून येत आहे. सध्या मानसी आपल्या सासरी हरियानाला गेली आहे. आणि ती सतत तेथील व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत आहे.
(हे वाचा:सोज्वळ अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही आहे संस्कारी; दिव्यांकाने केल होतं अरेंज मॅरेज)
नुकताच मानसीने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आपली सासू आणि आजीसासूसोबत एका गाण्यावर धम्माल डान्स करत आहे. सासू-सुनेची ही धम्माल पाहून चाहतेही खुश झाले आहेत. व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्स करून दादसुद्धा देत आहेत. तसेच सासू सुनेमध्ये असणाऱ्या या खास नात्याचं कौतुकदेखील करत आहेत.
(हे वाचा:झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप; या दिवशी असणार शेवटचा एपिसोड )
अभिनेत्री मानसी नाईकने काही महिन्यांपूर्वीचं लग्न केल आहे. ती बॉक्सर असणाऱ्या प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांचीही जोडी सोशल मीडियावर खुपचं पसंत केली जाते. दोघेही सतत सोशल मीडियावर आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असतात. या दोघांनाही चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.