• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO:‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी tips देणारी Malaika Arora झाली ट्रोल

VIDEO:‘आधी फिल्टर काढ’; ग्लोइंग स्किनसाठी tips देणारी Malaika Arora झाली ट्रोल

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या प्रत्येक दिवशी चर्चेत आहे. आता तिने ग्लोइंग स्किनसाठी दिलेल्या टिप्समुळे ती ट्रोल होत आहे.

 • Share this:
  मुंबई 2 जून: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या प्रत्येक दिवशी चर्चेत आहे. कधी तिच्या फॅशनमुळे, कधी फिटनेसमुळे किंवा ट्रोलिंगमुळे. नुकतीच ती आपल्या कुत्र्याला फिरवल्यामुळेही चर्चेत आली होती. तर आता तिने ग्लोइंग स्किनसाठी दिलेल्या टिप्समुळे ती ट्रोल होत आहे. (Malaika Arora trolled over beauty tips) मलायका नेहमीच तिच्या सोशल मीडियावर निरनिराळ्या पोस्ट करत असते. कधी ती फिटनेस टिप्स देते तर कधी ब्यूटी टिप्स अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या या टिप्स आवडतात. पण आता मात्र तिला ट्रोल केलं जात आहे. मलायका या सध्याच्या गर्मीच्या दिवसांत तेजस्वी त्वचा कशी ठेवावी यासाठी उपाय सांगत होती.

  मलायका की अमृता? Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट

  तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती चेहऱ्याला बर्फ लावत आहे. तर संपूर्ण चेहऱ्यावरून बर्फाचा गोळा फिरवत आहे. यामुळे त्वचा ग्लो करते. पण हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना मालयाकाने फिल्टरचा वापर केल्याने अनेक युझर्सनी तिला ट्रोल केलं. तर फिल्टरमुळे त्वचा तेजस्वी दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं.  तर काहींनी हे सगळं सर्जरीची कमाल असल्याचंही म्हटलं. व फिल्टर काढून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितला.
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  या पूर्वी मलायकाने अनेक व्हिडीओज पोस्ट केले आहेत. तिचे अनेक फिटनेस व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. नुकतच तिने कोरोनामुक्त झाल्यानंतरचा अनुभव सांगितला होता. व त्यानंतर वजन वाढलं होतं. व ते वजन कमी करणं हे मोठं टास्क असल्याचं ती म्हणाली होती. मलायका ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिच्या अनेक पोस्ट या सोशल मीडियावर व्हयरल होताना दिसतात. तिच्या प्रोफेशनल तसेच वयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चत राहते. अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अनेकदा ते दोघेही चर्चेत राहतात. मलायची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे.
  Published by:News Digital
  First published: