Home /News /entertainment /

चर्चा तर होणारच! डिनर पार्टीसाठी मलायकाने घातलेल्या या रेड आउटफिटची किंमत ऐकून व्हाल थक्क

चर्चा तर होणारच! डिनर पार्टीसाठी मलायकाने घातलेल्या या रेड आउटफिटची किंमत ऐकून व्हाल थक्क

फिटनेस (fitness queen Malaika arora) क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलायकाची चर्चा या लाल आउटफिमुळे होते आहे. बहिणीच्या घरच्या कॅज्युअल पार्टीसाठी मलायकाच्या या लुकची किंमत किती होती माहिती आहे का?

  मुबंई, 26 मार्च : बॉलिवूड (Bollywood) म्हटलं की, अभिनेते अभिनेत्रींचे ग्लॅमरस लुक (glamorous look) आपल्या डोळ्यासमोर येतात. अभिनेत्री आणि वर्कआऊट क्वीन म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा (Malaika Arora expensive red outfit) विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड लुक्स (bold look) साठी तर कधी तिच्या रिलेशनशिप वरून. यावेळी चर्चा आहे ती मलायकाच्या (Malaika Arora) महागड्या ड्रेसची. नुकतीच मलाईकाची बहीण अमृता अरोराच्या (Amruta Arora party) घरी एक पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीसाठी मलायकाने रेड आउटफिट परिधान केलं होतं. 65 हजारांची शॉर्ट पॅन्ट (shorts) , जवळपास 1 लाखांच्यावर किमतीचं जॅकेट (Jacket)  तिने घातलं होतं. याशिवाय तिने घातलेल्या हिल्सच्या सॅन्डल्सची (heels) किंमत ऐकून तर डोळे मोठे होतील. तब्बल 50 हजारांच्या या हिल्स आहेत. मलायकाच्या या अटायरमध्ये प्रत्येक गोष्ट ब्रॅण्डेड असल्याने तिच्या एकत्रित लुकची किंमत 2 लाखांच्या पुढे जाणारी होती. पार्टीसाठी इंडस्ट्रीतील बरेच नावाजलेले चेहरे ही उपस्थित होते. डिझायनर मनिष मल्होत्रा, करण जोहर (Karan Johar), नताशा पुनावाला, गौरी खान, सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी, करिष्मा कपूर आणि अर्जून कपूर (Arjun Kapoor) इ. मलाईका आणि अर्जून कपूर यांच्या नात्यामुळे देखील मलाईका चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दोघांच्याही ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या पण अर्जूने मलाईका सोबत पार्टी ला लावलेल्या हजेरीने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तर त्यांचा एकत्रित फोटोही सोशल मिडीया वर चांगलाच व्हायरल झाला. अभिनेता अरबाज खान पासून विभक्त झाल्यानंतर अर्जून आणि मलाईका एकमेकांना डेट करु लागले. तर मलाईका आणि अरबाज यांना अठरा वर्षीय मुलगा देखिल आहे.
  Real Hero सोनू सूदचा पुन्हा International स्तरावर सन्मान; Forbes ने दिला लीडरशिप अवॉर्ड
  मलायका अभिनयाव्यतिरिक्त तिच्या फिटनेस साठी ओळखली जाते. मलायका जिम आणि योगा दोन्ही व्यायाम प्रकारांना प्राधान्य देते. तिचे वर्कआऊट व्हिडीओस ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम, फेसबूक अकाउंटवर पोस्ट करत असते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Malaika arora

  पुढील बातम्या