मुंबई, 02 एप्रिल : अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला आहे (Malaika Arora accident). तिच्या कारला दुसऱ्या गाडीने धडक दिली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खालापूर टोलनाक्यावर ही घटना घडली असून मलायकाला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल आहे (Malaika Arora latest news).
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक झालं होतं. त्यावेळी काही गाड्या एकमेकांना धडकल्या. तीन-चार गाड्यांची टक्कर झाली. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये मलायकाची कारही होती. गाडीला अपघात झाला तेव्हा मलायका गाडीत होती. अपघातात ती जखमी झाली आहे. सुदैवाने थोडक्यात ती बचावली. तिला लगेच नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं.
मलायकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मलायकाची तब्येत आता ठीक आहे. तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. दरम्यान यात मलायकाच्या गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. गाडीच्या पुढील भाग चक्काचूर झाला आहे.
हे वाचा - अभिनेता Rajkumar Raoची आर्थिक फसवणूक, पॅनकार्डद्वारे परस्पर काढलं कर्ज
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितलं की, "मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जिथं हा अपघात झाला तो अपघाताचा जास्त धोका असल्याचा भाग आहे. तिन्ही वाहनं आपसात धडकली. तिन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर गाडीचालक तिथून फरार झाले. त्यामुळे कुणाला किती दुखापत झाली हे स्पष्ट नाही. पण सर्वांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत"
खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश कलसेकर यांनी सांगितलं, "आम्हाला तिन्ही कारचे रजिस्ट्रेशन नंबर मिळाले आहेत. कारमालकांशी संपर्क करून नेमकं काय घडलं याची माहिती घेतली जाईल. दुर्घटना कशी झाली, कुणाची चूक होती याचा तपास केल्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Malaika arora