मुंबई, 8 जुलै : अभिनेत्री मलायका (Malaika arora)अरोरा नेहमीच तिच्या बोल्ड आणि निराळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसचा पारा नेहमीच हाय असलेला पहायला मिळतो. अशातच मलायका पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंगमुळे (Malaika arora fashion)चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मलायकाचा (malaika arora latest video)लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं थोड्यावेळासाठी नेटकऱ्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही कन्फ्युज व्हाल.
मलायकाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तिनं न्यूड शेडची ब्रा आणि ट्रॅक पॅंन्ट घातली आहे. यावर तिनं डेनमिचं जॅकेट घातलं आहे. स्कीन फिट आणि स्कीन टोन (Malaika arora skin toned & skin fit look)घातलेल्या कपड्यांमुळे मलायका सध्या ट्रोल होत आहे. व्हिडीओमध्ये मलायका गाडीतून उतरताच लगेच घराकडे निघाल्याचं दिसतंय. मात्र गडबडीत मलाकानं काहीच घातलं नाही असं थोड्यावेळासाठी वाटतं. नीट पाहिल्यावर समजतंय की तिनं स्कीन टाईट पॅन्ट घातली आहे.
हेही वाचा - 'मी एक दिवस कपडेच घालणार नाही'; उर्फीच्या वक्तव्यानं एकचं खळबळ, पाहा VIDEO
मलायकाला तिच्या या लुकवरुन ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी कमेंट करत तिला म्हटलं की, 'अचानक पाहिल्यावर काहीच घातलं नाही असं वाटतंय'. तर काहींनी याला 'फॅशन डिझास्टर' असं म्हटलंय. मलायका सध्या तिच्या या लुकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
View this post on Instagram
मलायका अरोरा(Malaika arora age) 48 वर्षांची झाली आहे, पण या वयातही तिच्या सौंदर्य, फिटनेस आणि हॉटनेसमध्ये कोणतीही कमतरता नाही. त्यामुळेच आजही लाखो चाहते तिच्यावर फिदा आहेत. नुकतंच मलायका आणि अर्जुन त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी फ्रान्सला गेले होते. या ठिकाणी दोघांनी रोमॅन्टिक फोटोही शेअर केलेले पहायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Instagram, Malaika arora