Home /News /entertainment /

'तालिबानी भावांना राखी बांधेन आणि...' म्हणत अभिनेत्रीने PM मोदींनाच विचारला प्रश्न

'तालिबानी भावांना राखी बांधेन आणि...' म्हणत अभिनेत्रीने PM मोदींनाच विचारला प्रश्न

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माहिका शर्मा (Mahika Sharma) हिने अफगाणीस्थानच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करत ट्वीट केलं आहे, व थेट पतंप्रधान नरेंद्र मोदींनाच सवाल केला आहे.

     मुंबई 20 ऑगस्ट : सध्या जगभरात एकच चर्चा होत आहे ती म्हणजे अफगाणीस्तान (Afghanistan Crisis)  देशाची. तालिबानने (Taliban) या देशावर वर्चस्व प्रस्थापित केल्यापासून देशात अनागोंदी माजलेली दिसत आहे. देशातील नागरिक (Afghan citizens) हवालदिल झाले आहेत. तर सैरावैरा धावताना दिसत आहेत. देशाबाहेर पडण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. त्यातच तालिबानच्या दहशतवादी नियमांनी आणि बेधुंद गोळीबारांनी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर आता जगभरात चर्चा होताना दिसत आहे. भारताचं शेजारील राष्ट्र असल्याने देशात अनेकांकडून याचा निषेध केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच राजकीय नेत्यांनी यावर आपआपली मतं मांडली आहेत. तर सध्या एका अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माहिका शर्मा (Mahika Sharma) हिने अफगाणीस्थानच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करत ट्वीट केलं आहे, व थेट पतंप्रधान नरेंद्र मोदींनाच सवाल केला आहे. तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘मी अफगाणी महिलांना वाचण्यासाठी जात आहे. मी रक्षाबंधनाला सर्व तालिबान्यांना राखी बांधून माझे भाऊ बनवेन. त्यानंतर बहीण म्हणून मी त्यांना महिलांचा आदर करण्यास शिकवेन. त्यांना आई, बहीण किंवा मुली नसल्यामुळे ते असे गुन्हे करत आहेत. मोदीजी कशी वाटली माझी आयडीया?’ असं ट्वीट तिने केलं आहे. यानंतर तिच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. पुढे तिने असंही लिहिलं आहे की, ‘मला अशा व्यक्तीची गरज आहे जो माझी राखी तालिबान्यांपर्यंत पोहोचवेल. मी कुरिअरने राखी पाठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला नकार दिला’ यावर काहिंनी हास्यस्पद प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘रामायण’, ‘एफआयआर’ या मालिकांमध्ये ती दिसली होती.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Afghanistan, Entertainment, Taliban, Tv actress

    पुढील बातम्या