Home /News /entertainment /

माधुरी दीक्षितचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन; 20 वर्षानंतर करतेय भन्साळींसोबत काम

माधुरी दीक्षितचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन; 20 वर्षानंतर करतेय भन्साळींसोबत काम

'देवदास' नंतर पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि संजय लीला भंसाळी एकत्र काम करणार आहेत.

  मुंबई 21 मे : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali)  हे त्यांचा आगामी प्रोजेक्ट ‘हिरा मंडी’ (Hira Mandi) मध्ये सध्या व्यस्त आहे. त्यांची वेबसीरिज त्यांना चित्रपटांप्रमाणेच भव्य दिव्य अशी बनवायची आहे आणि यासाठीच ते पुरेपूर मेहनत घेताना दिसत आहेत. तर आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  देखिल या सीरिज मध्ये दिसणार असल्याचं समोर येत आहे. माधूरीने गेली काही वर्षे मोठ्या पडद्यावर आपल्या नृत्याचा धमाका दाखवला नव्हता पण आता मात्र ती या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला येणार असल्याचं समजतं आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार माधुरी या वेब सीरिज मध्ये नृत्य करणार असून संजय लीला भंसाळी यांना माधुरी पेक्षा दुसरा कोणताच चांगला चॉईस वाटत नव्हता. माधुरीच्या नृत्याचे, अभिनयाचे अनेक चाहते आहेत.त्यामुळे माधुरीचा हा परफॉर्मन्स खास ठरणार असल्याचं दिसून येत आहे.

  स्वप्निल-मुक्ताचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल; पाहून तुमच्याही चेहऱ्यावर उमटेल निखळ हास्य

  संजय लीला भंसाळी या त्याच्या ओटीटी प्रोजेक्टला भव्य दिव्य बनवण्यासाठी कसून मेहनत घेत आहेत. माधूरी एका स्पेशल गाण्यात दिसणार असून त्यासाठी तिला मोठं मानधन देण्यात आलं आहे. माधुरीला देखिल ही ऑफर आवडली आसून गाणं आणि दिग्दर्शन दोन्ही तिला पसंत आहे. लवरच हे गाणं शूट होणार असून जवळपास 8 ते 10 दिवसांचं मोठं वेळापत्रक या गाण्यासाठी ठरवण्यात आलं आहे. याआधी माधुरीने ‘देवदास’ (Devdas) या सुपरहीट चित्रपटात संजय लिला भंसाळी यांच्यासोबत काम केलं होत. त्यातील तिची भूमिका अजरामर ठरली होती. ‘चंद्रमुखी’ ही भूमिका तिने साकारली होती. या चित्रपटातील ‘मार डाला’ हे गाणं आजही मोठ्या आवडीने पाहिलं तसेच ऐकलं जात. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या बेवमालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत असून याशिवाय अभिनेत्री हुमा कुरेशी, निमरत कौर, सयानी गुप्ता, मनिषा कोइराला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय संजय लिला भंसाळी यांचा चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) देखिल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Madhuri dixit

  पुढील बातम्या