मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"महेश भट्टच फिल्म इंडस्ट्रीतील डॉन; ड्रग्ज कनेक्शनचीही माहिती", अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

"महेश भट्टच फिल्म इंडस्ट्रीतील डॉन; ड्रग्ज कनेक्शनचीही माहिती", अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत महेश भट्ट (mahesh bhatt) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत महेश भट्ट (mahesh bhatt) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत महेश भट्ट (mahesh bhatt) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 23 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील (bollywood) ड्रग्ज कनेक्शन (drug connection) समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी आहे. बॉलिवूडमध्ये याचं मोठं रॅकेट असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान आता महेश भट्टच (mahesh bhatt) फिल्म इंडस्ट्रीतील डॉन आहे आणि त्यांना ड्रग्ज कनेक्शनबाबत संपूर्ण माहिती आहे, असा खळबळजनक आरोप एका अभिनेत्रीनं केला आहे.

अभिनेत्री लवीना लोधने (luvienalodh) महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. लवीना लोधने 2010 साली हिमेश रेशमियासह कजरारे फिल्ममधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या फिल्मचं दिग्दर्शन महेश भट्ट आणि पूजा भट्टने केलं होतं. तिनं महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालशी लग्न केलं आहे आणि तो ड्रग्ज सप्लाय करायचा असा दावा तिनं केला आहे आणि याची माहिती महेश भट्ट यांनाही आहे, असं तिनं म्हटलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

I m being harrased by Mahesh Bhatt & family. Pls support.

A post shared by Actor | Luviena Lodh (@luvienalodh) on

लवीन लोधने सांगितलं, "मी महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालशी लग्न केलं होतं. त्याच्याविरोधात मी घटस्फोटाचा अर्ज केला आहे कारण तो सपना पब्बी, अमायरा दस्तूरसारख्या अभिनेत्रींना ड्रग्ज पुरवठा करतो हे मला समजलं. या सर्वाची माहिती महेश भट्ट यांना आहे. महेश भट्टच इंडस्ट्रीचे सर्वात मोठे डॉन आहेत आणि ते ही पूर्ण सिस्टम ऑपरेट करतात. जर तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागला नाहीत तर ते तुमचं जगणं मुश्किल करतात. महेश भट्ट यांनी किती तरी लोकांना कामावरून काढून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. ते फक्त एक फोन करतात आणि लोकांची नोकरी जाते"

हे वाचा -  'लक्ष्मी बाँब'विरोधात निदर्शनं करणार हिंदू सेना,लव्ह जिहाद प्रसारित केल्याच आरोप

"आता मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, तर ते माझ्या घरात घुसण्याचा आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पोलीस ठाण्यात एनसी करायला जाते तेव्हा कुणीच माझी एनसी घेत नाही आणि एनसी घेतली तरी त्यावर कारवाई होत नाही. जर मला किंवा माझ्या कुटुंबासह काही घडलं तर त्याला महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील. बंद दरवाजामागे हे लोक काय करतात ते लोकांना माहिती तर हवं. कारण महेश भट्ट खूप शक्तिशाली आणि प्रभावशाली आहेत", असं ती म्हणाली.

हे वाचा - 'सावरकरांना तुरुंगात टाकले तसंच मलाही..', Intolerance वर बोलून आमिरलाही कोपरखळी

दरम्यान महेश भट्ट यांच्या लिगल टीमने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महेश भट्ट यांच्या लिगल टीमने म्हटलं, "लविना लोधने महेश भट्ट यांच्यावर व्हिडीओतून जे आरोप केले आहेत, ते आम्ही फेटळातो आहे. हे आरोप चुकीचे आहेत आणि महेश भट्ट यांची बदनामी केली जाते आहे. कायद्याने हे गंभीर आरोप आहेत, याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करू"

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress