मुंबई 9 जून : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला (Sushant Singh Rajpoot) जाऊन आता वर्ष होत आहे. वर्षभरात त्याच्या चाहत्यांमुळे तसेच अनेक कारणांनी सुशांत जाऊनही सतत चर्चेत राहीला. तर आता सुशांतबरोबर स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.
क्रिती आणि सुशांतने 2017 साली आलेला चित्रपट राबतासाठी (Raabta) एकत्र काम केलं होतं. चित्रपटाला आता 4 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे क्रितीने सुशांतसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. चित्रपट बॉक्सऑफिसवर जरी जास्त चालला नसला तरीही त्यातील गाण्यांनी आणि सुशांत , क्रितीच्या केमिस्ट्रीने अनेकांची मनं जिंकली होती.
बारीक होण्यासाठी राखी सावंतची कठोर मेहनत, पाहा कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायचंय राखीला
क्रितीने चित्रपटातील सुशांतचे काही सीन्स एका व्हिडीओच्या स्वरूपात शेअर केले आहेत. तसेच तिने मोठ कॅप्शन लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ती लिहीते, ‘तन लडे, तन मुक जाये... रुह जुडे, जुडी रेह जाये...’ पुढे तिने लिहीलं आहे, ‘माझा कनेक्शन्सवर विश्वास आहे. मला विश्वास आहे की आपण लोकांना भेटतो त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. माझा राबता हा सुशांत, दिनो आणि मॅडॉक फिल्सशी असाच होता.’
View this post on Instagram
पुढे ती म्हणते, ‘चित्रपट येतील जातील.. पण प्रत्येक चित्रपटाशी जोडलेल्या आठवणी असतात. पण जे संबध आपण तयार करतो, जे क्षण आपण जगतो ते आपल्या सोबत कायम राहतात. काही त्यापेक्षा जास्त. राबता माझा सगळ्यात जास्त लक्षात राहणारा अनुभव होता आणि कायम माझ्या हृदयाजवळ राहील. माहित नव्हतं हा आपला पहीला आणि शेवटाचा ठरेल.’ अशा शब्दांत क्रितीने भावूक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
येत्या 14 जून ला सुशांतला जाऊन वर्षपूर्ती होत आहे. मागील वर्षी सुशातंने जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे यापूर्वीच क्रितीची ही पोस्ट सुशांतच्या चाहत्यांसाठीही भावुक ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची पूर्व प्रेयसी राहीलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही (Ankita Lokhande) ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील आठवणींचा व्हिडिओ शेअर केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kriti sanon, Sushant sing rajput, Sushant Singh Rajput