Home /News /entertainment /

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा: आणखी एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा: आणखी एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

मनीष पॉल (Manish Paul) आणि तनाज इराणीनंतर (Tannaz-Irani) आणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे.

    मुंबई, 07 डिसेंबर: बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी दिवसभरात अनेक दु:खद बातम्या आल्या. दिवसाची सुरुवात झाली तीच दिव्या भटनागरच्या (Tannaz Irani) निधनाच्या बातमीने. कोरोनाशी झुंज देताना तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेता, सूत्रसंचालक मनीष पॉललाही कोरोना झाल्याचं समोर आलं. तसंच तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इंन्टाग्रामवरुन तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात (Corona Virus) अडकली आहे. अभिनेत्री कृती सेनॉनचे (Kriti Sanon) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कृती राजकुमार रावसोबत चंदीगडमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होती त्यावेळी तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कृतीच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. पण तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कृती सेनॉन अखेर अर्जुन कपूर (Ajrun Kapoor) आणि संजय दत्तसोबत (Sanjay) 'पानीपत' चित्रपटात दिसली होती. कृती सॅनॉन आता 'मिमी' चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकरसोबत दिसणार असून त्यामध्ये ती सरोगेट मदरची भूमिका साकारत आहे. याशिवाय कृती सेनॉनचे अक्षय कुमार यांच्यासह 'बच्चन पांडे' आणि प्रभाससमवेत 'आदिपुरुष' असे मोठे चित्रपट आहेत. काही दिवसांपूर्वीच जुग जुग जियो या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नीतू कपूर, वरुण धवन (Varun Dhawan) यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. तसंच फिल्मचे दिग्दर्शक राज मेहतादेखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं. त्याच फिल्ममध्ये  काम करणारा अभिनेता मनीष पॉललाही (Manish Paul) कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचं लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood actress, Coronavirus

    पुढील बातम्या