Home /News /entertainment /

VIDEO: 'तुम्ही माझ्या आयुष्यात...', क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी खास पोस्ट

VIDEO: 'तुम्ही माझ्या आयुष्यात...', क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी खास पोस्ट


VIDEO: 'तुम्ही माझ्या आयुष्यात...', क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी खास पोस्ट

VIDEO: 'तुम्ही माझ्या आयुष्यात...', क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी खास पोस्ट

अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) नवरा समीर वानखेडेसाठी (Sameer Wankhede) बऱ्याच दिवसांनी एक खास पोस्ट केली आहे. क्रांतीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

  मुंबई, 24 मे: मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) लवकरचं नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेट येत आहे. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिच्या दररोजच्या आयुष्यातील घडामोडी ती सर्वांसोबत शएअर करत असते. क्रांतीचं यू ट्यूब चॅलेनही असून त्यावर ती तिच्या मुलींचे व्हिडीओ, ब्युटी टीप्स शेअर करत असते. तिच्यासोबत दररोड घडणारे किस्से देखील ती सर्वांसोबत रिल्सद्वारे शेअर करत असते. क्रांतीने यावेळी तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच मुंबईचे माजी एनसीबी (NCB) विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.  क्रांतीने समीरचा घरातील व्हिडीओ शेअर केला असून समीर वरील प्रेम क्रांतीने व्यक्त केलं आहे. क्रांतीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये समीर बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. तिने म्हटलंय, 'मी फार नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात'.  व्हिडीओत समीर लॅपटॉपवर काम करताना दिसत आहेत. मध्येच ते मुलींसोबत फुग्याबरोबर खेळताना देखील दिसत आहेत.  समीर  आपल काम आणि घर दोन्ही योग्यरित्या संभाळू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न क्रांतीने तिच्या व्हिडीओमधून केला आहे. क्रांती बऱ्याच दिवसांनी पती समीरसाठी खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट तिच्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
  हेही वाचा - हृता दुर्गुळे-प्रतीक शाहचा रोमँटिक अंदाज, अभिनेत्रीने शेअर केले खास PHOTO समीर यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांच कौतुक केलंय. 'तुम्ही रिअर हिरो आहात' असे अनेकांनी म्हटलंय. एका युझरने म्हटलेय, 'तुमच्या चौकोनी कुटुंबाला खूप शुभेच्छा'. तर दुसऱ्याने म्हटलंय, 'तुम्ही खरंच रिअर हिरो आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे', 'आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे', 'हॅट्स ऑफ सर', 'तुमच्या कुटुंबाला खुप प्रेम आणि आशिर्वाद', अशा अनेक कमेंटचा वर्षाव क्रांतीच्या पोस्टवर चाहत्यांनी केला आहे. अभिनेत्री क्रांती प्लानेट मराठी या ओटीटी माध्यमासोबत तिच्या आगमी प्रोजेक्टवर काम करत आहे. क्रांती एक अभिनेत्री तसेच निर्माती देखील आहे. आता ती वेब विश्वातही तिच्या निर्मितीचं पुढचं पाऊल ठेवत आहे. तर क्रांतीचा पती समीर वानखेडे मागील वर्षी चर्चेचा विषय बनले होते. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्याच सापडले होते.  तेव्हा पत्नी क्रांती रेडकर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी होती. अनेकदा क्रांतीने मीडियासमोर येऊन पतीची आणि कुटुंबाची बाजू देखील मांडली होती.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या