Home /News /entertainment /

पंन्नाशीनंतरही किशोरी शहाणे स्लिम-ट्रीम; पाहा त्यांचा फिटनेस फंडा

पंन्नाशीनंतरही किशोरी शहाणे स्लिम-ट्रीम; पाहा त्यांचा फिटनेस फंडा

अभिनेत्री किशोरी शहाणे देत फिटनेस इन्स्पिरेशन पाहा त्यांचे वर्कआउट व्हिडीओ.

  मुंबई 26 जून : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) आजही तितक्याच फिट पाहायला मिळतात. मराठी चित्रपटांत त्या जास्त दिसत नसल्या तरीही अनेक मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. किशोरी यांनी स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फिटनेस व्हिडीओ शेअर करत असतात. इतकच नाही तर अनेकदा त्या मैदानात खेळतानाही दिसतात. 53 वर्षीय किशोरी यांचा फिटनेस वाखाणण्याजोगा नक्कीच आहे. (Kishori Shahane fitness video)
  अनेक अभिनेत्री स्वतःच्या फिटनेवर फार लक्ष देत असतात. त्यातीलच एक किशोरी शहाणे आहेत. पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांनी फिट राहणंच पसंत केलं. पण त्यासाठी मेहनतही घ्यावी लागतेच. किशोरी त्यांच्या व्हिडीओसमधून फिट राहण्यासठी मेहनत घेताना दिसत आहेत.
  किशोरी शहाणे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनेकदा त्या त्यांची नृत्याची आवड जोपासतानाही दिसतात. अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. ‘बिग बॉस मराठी’  नंतर किशोरी फारच चर्चेत आल्या होत्या. बिग बॉसमधील त्यांची स्पर्धकांशी असलेली जुगलबंदी प्रेक्षकांना फारच आवडली होती.
  किशोरी शहाणे सध्या काही हिंदी मालिकेत काम करताना दिसतात. सध्या त्या ‘गुम है किसी के प्यार मे’ या हिंदी मालिकेत काम करत आहेत. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटांतही त्या दिसतात. ‘आनंदी आनंद’, ‘माझा पती करोडपती’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ तर अलिकडे आलेला ‘क्लासमेट्स’ अशा अनेक सुपरहीट चित्रपटांत किशोरी शहाणे यांनी काम केलं होतं. तसेच काही मराठी मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या