मुंबई 12 सप्टेंबर : अभिनेत्री खुशबू तावडे (Khushbu Tawade) आणि अभिनेता संग्राम साळवी (Sangram Salvi) लवकरच आई बाबा होणार आहेत. नुकतीच त्यांनी ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली होती. तर आता खुशबूचं डोहाळे जेवण देखील पार पडलं आहे. दोघेही या कार्यक्रमात अतिशय आनंदी दिसत आहेत. तर खुशबूच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद दिसत आहे.
सुंदर हिरवी साडी परिधान करून तिने साजशृंगार केला होता. यात खुषबुची बहीण अभिनेत्री तीतिक्षा तावडे (Teetiksha Tawde) देखील दिसत आहे. मावशी होणार असल्याने ती देखील आनंदी दिसत आहे. खुशबूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. दोंघांच्याही चाहत्यांनी त्यांना भरघोस शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
View this post on Instagram
2018 साली खुशबू आणि संग्राम यांनी विवाह केला होता. दोघांनीही अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. संग्राम देवयानी या मालिकेनंतर फारच प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे खुशबूने देखील या मालिकेत लहानस पात्र साकारल होतं.
View this post on Instagram
आम्ही दोघी, तू भेटशी नव्याने, पारिजात, मेरे साई, तेरे बिन या मालिकांमध्ये खुशबू दिसली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत देखील तिने काही एपिसोड्स साठी काम केलं आहे. ‘लव्ह फॅक्टर’ या चित्रपटात देखील खुषबूने काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.