मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा ट्रोल, दारू पितानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर दिलं अनोखं उत्तर

अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा ट्रोल, दारू पितानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर दिलं अनोखं उत्तर

केतकी चितळे हिने आणखी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून दारू पिण्याच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना त्यातून उत्तर दिलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 17 जुलै : मराठी अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं वक्तव्य केल्यानंतर केतकी चितळेनेही (Ketaki Chitale) या वादात उडी घेतली. केतकीने स्टॅण्डअप कॉमेडियनवर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक फेसबुक पोस्ट लिहित निशाणा साधला होता. 'शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,' अशा आक्रमक शब्दांमध्ये केतकीने आपली भूमिका स्पष्ट केली होती. केतकी चितळेने घेतलेल्या भूमिकेनंतर तिलाही सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या वादानंतर आता सोशल मीडियात केतकी चितळेचे काही फोटो व्हायरल करण्यात आले. यामध्ये एक असाही फोटो व्हायल करण्यात आला आहे, ज्यामध्ये केतकी दारू पिताना दिसत आहे. हा फोटो व्हायल झाल्यानंतर केतकी चितळे हिने आणखी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून दारू पिण्याच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना त्यातून उत्तर दिलं आहे. या पोस्टमधून केतकीने आरोप आणि सत्य असे दोन फोटो शेअर केले असून एका बाजूला तिचा दारू पितानाचा व्हायरल होत असलेला फोटो तर दुसऱ्या बाजूला दारूतून सरकारला मिळणारा कर याबाबतची बातमी असलेला फोटो शेअर केला आहे. दरम्यान, पोस्टनंतरही केतकी चितळे हिला आता आणखीनच ट्रोल केले जाऊ लागले आहे.
First published:

पुढील बातम्या