नेत्याने धमकी दिल्याचा आरोप, अभिनेत्री केतकी चितळेनी शेअर केला स्क्रीनशॉट

नेत्याने धमकी दिल्याचा आरोप, अभिनेत्री केतकी चितळेनी शेअर केला स्क्रीनशॉट

केतकी चितळेनी आणखी एक पोस्ट लिहिली असून त्यातून शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : फेसबुकवर लिहिलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) सध्या चर्चेत आहे. स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सोशल मीडियावर तरुणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र त्यानंतर केतकी चितळे हिने या तरुणांवर आक्रमक टीका केली. त्यामुळे केतकीलाही ट्रोल केलं जात आहे. अशातच केतकी चितळेनी आणखी एक पोस्ट लिहिली असून त्यातून शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

'शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे,' असं म्हणत केतकी चितळे हिने तिला आलेल्या मेसेजेसचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

'महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करता तुम्ही आणि हसता...महाराष्ट्रात राहुन त्यांच्या जीवावर नाव कमावले तुम्ही आणि एकेरी उल्लेख...मी शिवसेनेचा विभागप्रमुख आहे...पुन्हा खोटारडे लोक असा शब्द केला ना.. मग बघ,' असं मेसेजमध्ये लिहिलं असल्याचं केतकी चितळेने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

केतकी चितळे सोशल मीडियावर ट्रोल, नक्की काय होती फेसबुक पोस्ट?

'3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,' असं म्हणत केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमधून सोशल मीडियावर राग व्यक्त करणाऱ्यांवर टीका केली होती.

Published by: Akshay Shitole
First published: July 14, 2020, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading