Home /News /entertainment /

Ketaki Chitale Bail: शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अखेर जामीन

Ketaki Chitale Bail: शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अखेर जामीन

Ketaki Chitale Bail: शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अखेर जामीन

Ketaki Chitale Bail: शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अखेर जामीन

शरद पवारांबाबात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेली अनेक दिवस केतकी न्यायालयीन कोठडीत होती.

    मुंबई, 22 जून:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी ( Ketaki Chitale) चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी केतकी विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ठाणे कोर्टात सुनावणी पार पडली आणि अखेर केतकी चितळेला या प्रकरणात ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. (ketaki chitale granted bail)   याआधीही याच प्रकरणी कळंबोली पोलिसांनी केतकीला जामीन दिला होता.  शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिचा कोठडीतील मुक्काम वाढतच गेला. गेली अनेक दिवस केतकी जामीनासाठी प्रयत्न करत होती. अखेर तिला या प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्याचप्रमाणे केतकी चितळेवर अॅट्रोसिटी प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातही ठाणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.  केतकीने 1 मार्च 2020मध्ये केलेल्या वादग्रस्त पोस्टप्रकरणी तिच्या अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवबौद्ध लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनाला येतात अशा प्रकारचा मजकूर असलेली पोस्ट तिनं शेअर केली होती. हेही वाचा - भाजपची पडद्यामागची बॅटिंग संपली, आता थेट मैदानात, प्रदेशाध्यक्ष मोर्चेबांधणीसाठी गुवाहाटीत, पुढची रणनीती तयार अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं होतं. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट लिहीली होती. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये  153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातही केतकीवर गुन्हा दाखल झाल्यानं केतकी चितळे चांगलीच अडचणीत आली होती. केतकी चितळे याआधीही तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हा आणि तक्रारी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ होती. आधी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे आणि त्यानंतर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं केतकीला अनेक दिवस कोठडीत काढावे लागले. परंतू आता दोन्ही प्रकरणात केतकीला जामीन मंजूर झाला आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या