मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ketaki Chitale : केतकी चितळेची नवी पोस्ट चर्चेत; पाहा आता काय म्हणाली अभिनेत्री?

Ketaki Chitale : केतकी चितळेची नवी पोस्ट चर्चेत; पाहा आता काय म्हणाली अभिनेत्री?

जवळपास 3 महिन्यांनी अभिनेत्री केतकी चितळेनं नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.

जवळपास 3 महिन्यांनी अभिनेत्री केतकी चितळेनं नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.

जवळपास 3 महिन्यांनी अभिनेत्री केतकी चितळेनं नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 ऑगस्ट : अभिनेत्री केतकी चितळे मागील काही महिन्यांपासून तिच्या फेसबुक पोस्टमुळे चांगलीच चर्चत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या फेसबुकपोस्टमुळे केतकीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. केतकीला या प्रकरणी तुरूंगात जावं लागलं. इतकंच नाही तर केतकीविरोधात मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी FIR दाखल करण्यात आल्या होत्या. सध्या या सगळ्या प्रकरणात केतकीला दिला मिळाला आहे. या सगळ्यात केतकीला फेसबुक वापरण्यास बंदी करण्यात आली होती. तिचे सगळे एक्सेस काढून घेण्यात आले होते. दरम्यान नुकतेच केतकीला तिच्या फेसबुक अकाऊंटचे सगळे एक्सेस परत मिळाले आहेत. फेसबुक एक्सेस परत मिळताच केतकीन नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं पुन्हा एकदा केतकीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सोशल मीडिया हे आता सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.  वादग्रस्त पोस्टमुळे केतकीचा फेसबुक एक्सेस काढून घेण्यात आला होता. पण आता तो तिला परत मिळताच केतकीनं आनंद व्यक्त केला आहे. याच आनंदात तिनं पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं म्हटलंय, 'आणि अखेर मला माझ्या फेसबुकचा एक्सेस मिळाला आहे. निदान तात्पुरता तरी. Lol'. केतकीच्या या पोस्टनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केतकीला फेसबुक एक्सेस मिळाल्यानंतर केतकी आता पुढे काय काय पोस्ट करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. इतकंच नाही तर केतकीवर आता सायबर क्राइम लक्ष ठेवून असणार असल्याच्या चर्चाही पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा - ketaki chitale: शाई फेकल्यामुळे खराब झालेल्या ब्लाऊजचं केतकी चितळेनं काय केलं पाहा; आता VIDEO होतोय व्हायरल

केतकीनं शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट 13 मे 2022 रोजी केली होती. तिला ही पोस्ट डिलीट करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र तिनं ती पोस्ट डिलीट केली नाही. हे प्रकरण इतकं तापल्यानंतरही केतकीच्या फेसबुक वॉलवर ती 13 मे ची शेवटची पोस्ट दिसत आहे. त्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी केतकीनं नवी पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. आता केतकीच्या पोस्टवरील कमेंट  बॉक्स बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टवर एकही कमेंट पाहायला मिळत नाही.

केतकीवर महाराष्ट्राभरात दाखल करण्यात आलेल्या सगळ्या FIR एकाच पोलीस ठाण्यात वर्ग कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. केतकीच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार, सगळ्या FIR ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत.

First published:

Tags: Facebook, Marathi actress, Marathi entertainment, Sharad Pawar