मुंबई 5 जून : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. इतर महीलांप्रमाणे करीनाचही प्रेग्नंसीनंतर मोठ्या प्रमाणात वजन वाढलं होतं. पण आता काहीच दिवसांत तिने स्वतःला फिट (Fitness) केल्यांचं दिसत आहे.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. व त्यानंतर महिन्याभरातच तिने कामालाही सुरुवात केली होती. पण तिचं वजन प्रंचड प्रमाणात वाढलं होतं. नुकताच करीनाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती अतिशय फिट दिसत आहे. तिने एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. ज्यात मागे योगा मॅट दिसत आहे. त्यामुळे करीना स्वतःला पुन्हा एकदा पुर्वीसारखीचं स्लिम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
करीनाने 2012 साली अभिनेता सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) विवाह केला होता. त्यानंतर 2016 साली तैमुर या त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. त्यावेळीही करीनाचं मोठ्या प्रमाणात वजन वाढलं होतं. तब्बल 25 किलो वजन जास्तीने वाढल्याचंही ती म्हणाली होती. त्यामुळे तेव्हाही करीनाने मुलाच्या जन्माच्या महिन्याभरानंतर तिने व्यायाम सुरू केला आणि काही दिवसांतच तिने संपूर्ण वाढलेलं वजन घटवलं होतं.
सोनालिका झाली माधवी भाभी; मराठी अभिनेत्रीला कसं मिळालं 'तारक मेहता'मध्ये काम?
करीना गर्भवती असतानाही फिटनेस विषयी अनेक गोष्टी ती शेअर करत होती. तसेच ती त्या दरम्यानही ती प्रेग्नंसी योगा करत होती. त्याचे अनेक फोटोही तिने शेअर केले होते.
View this post on Instagram
करीना आताही कठोर मेहनत घेऊन स्वतःला फिट ठेवत आहे. ती नेहमीच फिटनेस संबधी फोटो , व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच लॉकडाउन असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ ती आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे. व घरीच व्यायाम देखील करत आहे. सध्या सोशल मीडियावर ती फार सक्रिय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kareena Kapoor