करीना कपूरचा चढला पारा; बेशिस्त नागरिकांना सुनावले खडेबोल

करीना कपूरचा चढला पारा; बेशिस्त नागरिकांना सुनावले खडेबोल

अजूनही मास्क घालण्यासाठी अनेकांना सक्ति कारावी लागत आहे. तर विनाकारण लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. या सगळ्यावर आता अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने देखिल भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई 28 एप्रिल :  देशातील कोरोनाची परिस्थिती (corona pandemic) बिकट आहे. रुग्णांचे रोजच नवे आकडे समोर येत आहेत. पण अजूनही काही नागरीकांना कोरोनाचं गांभिर्य लक्षात येताना दिसत नाही. तर अजूनही मास्क घालण्यासाठी अनेकांना सक्ति कारावी लागत आहे. तर विनाकारण लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. या सगळ्यावर आता अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)  ने देखिल भाष्य केलं आहे. तर नियम मोडणाऱ्यांवर ती फारच संतापली आहे. (Kareena lashes out on irresponsible people)

करिनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये करिना म्हणते, ‘माझ्यासाठी ही गोष्ट फारच अविश्वसनिय आहे की काही लोकांना अजूनही देशात सुरु असलेल्या परिस्थितीचं गांभिर्य समजलेले नाही.’ पुढे करिना म्हणते, ‘पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल, मास्क तोंडाच्या खाली हनुवटीवर घालाल किंवा नियम मोडाल तेव्हा आपल्यासाठी राबणाऱ्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफचा विचार करा.’

'माझ्या मित्राचा श्वास गुदमरतोय...'; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मदतीसाठी पसरले हात

 यापुढे लिहीत करिनाने म्हटलं आहे,  'डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ आता शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या तुटले आहेत. त्यामुळे आता आपण प्रत्येकजण जे जे लोक ही पोस्ट वाचत आहेत ते सर्वजण करोनाची चैन तोडण्यासाठी जबाबदार आहोत. आपल्या भारत देशाला ख-या अर्थाने आपली गरज आहे,  याआधी इतकी कधीच भासली नव्हती.’

करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टावर तिला अनेक कमेंट्स ही मिळाल्या आहेत. अक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर कमेंट करत करीनाला साथ दिली आहे.

सध्या करिना तिच्या सोशल मीडियावर फारच सक्रिय (active on social media)असते. निरनिराळ्या पोस्ट ती करत असते. तसेच आपल्या कुटुंबाचे मुलांचे फोटोही शेअर करत असते.

Published by: News Digital
First published: April 29, 2021, 6:36 PM IST

ताज्या बातम्या