मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वजन कमी होताच करीनाने वाढवली फी; एका चित्रपटासाठी मागितलं इतक्या कोटींचं मानधन

वजन कमी होताच करीनाने वाढवली फी; एका चित्रपटासाठी मागितलं इतक्या कोटींचं मानधन

रामायणातील या भूमिकेसाठी करीनाची अवाढव्य मागणी; किंमत ऐकून निर्मातेही चक्रावले

रामायणातील या भूमिकेसाठी करीनाची अवाढव्य मागणी; किंमत ऐकून निर्मातेही चक्रावले

रामायणातील या भूमिकेसाठी करीनाची अवाढव्य मागणी; किंमत ऐकून निर्मातेही चक्रावले

  • Published by:  News Digital

मुंबई 8 जून : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नुकतीच दुसऱ्यांदा आई झाल्यामुळे घरीच कुटुंबासोबत व मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. तसेच तिने आता लवकरत कामालाही सुरूवात करायचं ठरवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर्वीच्या फिट बॉडीत येण्यासाठी ती कसून व्यायामही करताना दिसत आहे. पण आता एका चित्रपटाच्या मानधानावरून ती चर्चेत आली आहे.

‘रामायण’ (Ramayan) हा चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहे. व त्यातील सीतामातेच्या (Seetamata) भूमिकेसाठी त्यांनी करीनाला निवडायचं ठरवलं पण करीनाची फी ऐकून निर्मातेही मोठ्या गोंधळात पडले. या रोल साठी करीनाने तब्बल 12 कोटी रुपायांची मागणी केली. एरवी करीना एका चित्रपटासाठी 6 ते 8 कोटी रुपये मानधन घेते. पण तिने अचानक केलेल्या या वाढीमुळे निर्माते गोंधळून गेले आहेत. (Kareena increased fees)

करीनाने फीस वाढवल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाच्या तयारीला आणि आणखी 7 ते 8 महिने लागण्याची शक्यता आहे. व करीनासोबत त्यांची बोलणी देखील सुरू आहे. अजून चित्रपटाविषयी निर्मात्यांनी कोणतही अधिकृत विधान केलेलं नाही. पण लवकरच याविषयी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'कोणत्या वर्गात आहेस?'; श्रुती मराठेच्या फोटोंवर चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न

करीनाच्या हातात आणखी दोन चित्रपटही आहेत. ‘वीरे दी वेडींग’ आणि हंसल मेहतांच्या आणखी एका चित्रपटासाठी ती काम करत आहे. तसेच आमिर खान सोबत लवकरच ती ‘लालसिंग चड्डा’ (Lalsingh Chadda) या चित्रपटातही झळकणार आहे. याशिवाय करीना करण जोहरच्या ‘तख्त’ (Takhta) चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अनिल कपूर, आलिया भट्ट ,विक्की कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर अशी मोठी स्टारकास्ट दिसून येणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Kareena Kapoor