'तिसरं मुल झाल्यास जेलमध्ये पाठवा', कंगनाच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी आठवण करून 'ती' गोष्ट

'तिसरं मुल झाल्यास जेलमध्ये पाठवा', कंगनाच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी आठवण करून 'ती' गोष्ट

लोकसंख्येवर भाष्य (tweeted on population) करत तिसरं मूल जन्माला घातल्यास जेल मध्ये टाकण्याचा उपाय कंगना ने सुचवला आहे. पण या ट्विटमुळे कंगना स्वत:च ट्रोल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut)  रोजच निरनिराळ्या विषयांवर ट्विट (Tweet) करत भाष्य करत असते. तर आता तिने चक्क लोकसंख्येवर भाष्य (tweeted on population) करत तिसरं मूल जन्माला घातल्यास जेलमध्ये टाकण्याचा उपाय सुचवला आहे. पण या ट्विटमुळे कंगना स्वत:च ट्रोल होत आहे.

कंगनाने तिच्या ट्विट मध्ये म्हटलं होतं, “वोटींगचं राजकारण बाजूला ठेऊन आजचं संकट पाहता कमीत कमी तिसरं मूल असणाऱ्यांना दंड किंवा कारावासाची शिक्षा व्हायला हवी”. असं तिचं म्हणणं होत, पण आता कंगनाचं ट्विट पाहून नेटकऱ्यांनी तिला तिच्या भावाची आणि बहिणीची आठवण करून दिली आहे. कंगनाला एक मोठी बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel)  तर लहान भाऊ अक्षत रणौत आहे.

कंगनाने हे ट्विट कोरोना संक्रमण तसेच लशींचा होत असेलेला तुटवडा या संदर्भात केलं होत तर या ट्विट आधी आणखी दोन ट्विट तिने केले होते. त्यातील एका ट्विट मध्ये तिने अवैधरित्या भारतात होणाऱ्या घुसखोरांचा उल्लेख केला आहे.

पण कंगनाच्या तिसऱ्या अपत्यावरील ट्विटने युझर्स तिच्यावर संतापले आहेत. त्यावर कॉमेडियन सलोनी गौरने तिला रिप्लाय दिला आहे. तिने लिहिलं , ‘कंगना तुम्हीही तीन भाऊ – बहिण आहात’.

हे वाचा - सलमान खानच्या चाहत्यांसाठी GOOD NEWS, ईदला ‘राधे’ येणार भेटीला

त्यावर कंगनाने रिप्लाय देत मूर्ख असं लिहिलं आहे. तसेच तिने सलोनीच्या कॉमेडीला एक जोक संबोधल. ‘माझ्या आजोबांचे 8 बहिण भाऊ होते. त्या काळात खूप मूल मरायची, आपण बदलत्या काळासोबत बदललं पाहीजे. लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे. चीन प्रमाणेच आपल्याकडेही काही नियम हवेत’. असं कंगना म्हणाली.

Published by: News Digital
First published: April 21, 2021, 7:28 PM IST

ताज्या बातम्या