Manikarnika Returns : झाशीच्या राणीनंतर काश्मीरची वॉरिअर क्वीन बनणार कंगना रणौत

Manikarnika Returns : झाशीच्या राणीनंतर काश्मीरची वॉरिअर क्वीन बनणार कंगना रणौत

2 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या मणिकर्णिकाच्या (Manikarnika) यशानंतर आता कंगना रणौत (kangana ranaut) मणिकर्णिका रिटर्न्ससाठी (manikarnika return) साठी सज्ज झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : मणिकर्णिका (Manikarnika) नंतर अभिनेत्री कंगना रणौत आता मणिकर्णिका रिटर्न्स (Manikarnika Returns) घेऊन येत आहे. कंगनाने तिच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची घोषणा केली आहे. यामध्ये बॉलिवूडची क्वीन  झाशीच्या राणीनंतर आता काश्मीरच्या राणीची भूमिका साकारणार आहे.

कंगनाने नुकताच तिच्या ट्विटर हॅण्डलवरून मणिकर्णिका रिटर्न्स या सिनेमाची घोषणा केली आहे. कंगनाने या ट्वीटमध्ये मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा' (Manikarnika Returns: The Legend of Didda) असं चित्रपटाचं संपूर्ण नाव दिलं आहे. यावरून कंगना या सिनेमात राणी दिद्दा (Queen Didda) यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

कंगनानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे, आपला  भारत देश झाशीच्या राणीसारख्या (Rani Lakshmi Bai) बर्‍याच वीरांच्या कथेचा साक्षीदार आहे. अशीच आणखी एक रणरागिणी म्हणजे काश्मीरची राणी (Kashmir Queen). जिनं महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केलं. निर्माता कमल जैन (Kamal Jain) आणि मी (कंगना रणौत) लवकरच या रणरागिणीची धाडसी कथा मणिकर्णिका रिटर्न्स द लीजेंड ऑफ दिड्डा च्या माध्यमातून घेऊन येत आहोत"

याआधी मणिकर्णिकामध्ये कंगनाची जबरदस्त अॅक्टिंग (Acting) पाहायला मिळाली.  गेल्या वर्षी कंगना रणौतच्या पंगा (Panga) सिनेमानंतर लॉकडाऊन दरम्यान तिचा कुठलाही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. पंगा (Panga), क्वीन (Queen), मणिकर्णिका या फिल्मनंतर पुन्हा एकदा कंगना एका वीर स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाचे चाहते मणिकर्णिका रिटर्न्स या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान कंगना लवकरच थलाईवी (Thalaivi) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची (Jailalitha) भूमिका साकारली  आहे.    .

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading