• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना चक्क कंगनाच्या डोळ्यात पाणी

'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना चक्क कंगनाच्या डोळ्यात पाणी

मुंबई हायकोर्टाने बीएमसीला फटकारल्यावर भल्याभल्यांना रडू आणणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्याही डोळ्यात चक्क पाणी आले आहे. याविषयी तिने ट्वीट केले आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : मुंबई महापालिकेने कारवाई केलेली अभिनेत्री कंगना रणौतचे (Kangana Ranaut) वांद्रे येथील कार्यालय अद्याप तसेच पडझड झालेल्या अवस्थेत असल्याने मुंबई हायकोर्टाने पालिकेला फटकारले आहे. कंगनाने याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उद्यापासून मुंबई हायकोर्टात (Mumbai High court) सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC)वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या कारवाईविरोधात कंगना हायकोर्टात धाव घेतली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिकेला याप्रकरणी उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं एक आठवड्याची मुदत दिली आहे. दरम्यान कंगनाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी करणाऱ्या पालिकेचे हायकोर्टाने कान टोचले आहे. कोर्टाने असे म्हटले आहे की, 'आम्ही तोडकाम केलेली प्रॉपर्टी अशीच ठेवू शकत नाही. आम्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे उद्यापासून ऐकू. तुम्हाला आता अधिक वेळ हवा आहे, पण कारवाई मात्र लगेच करता.' (हे वाचा-नवाझुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाचा बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप,दाखल केली तक्रार) कोर्टाने बीएमसीला फटकारल्यावर भल्याभल्यांना रडू आणणारी अभिनेत्री कंगना हिच्याही डोळ्यात चक्क पाणी आले आहे. याविषयी तिने ट्वीट केले आहे. तिने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'आदरणीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, यामुळे माझ्या डोळ्यांत अश्रू आले, मुंबईच्या जोरदार पावसात माझे घर खरोखरच कोसळले आहे, तुम्ही माझ्या तुटलेल्या घराविषयी एवढ्या काळजीने विचार केला, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मनाला खूप बरे वाटत आहे. मी जे सर्वकाही गमावले ते मिळवून देण्यासाठी धन्यवाद'. कंगना रणौतच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावरील 12 अनधिकृत बांधकाम जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्यानं तोडत कारवाई केली होती. यावेळी कंगनाच्या कार्यलयाबाहेर मोठा पोलिस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. (हे वाचा-चौकशीसाठी समन मिळालाच नाही', रकुल प्रीत सिंह कारणं देत असल्याचा NCBचा आरोप) कंगनानं 2017 मध्ये हा बंगला विकत घेतला होता. या बंगल्याच्या दुरुस्तीच्या नाववर बेकायदा अंतर्गत बदल करण्यात आले होते. हा बंगला निवासी असून त्यात बेकायदा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका महापालिकेनं ठेवला आहे. दरम्यान, या तोडकामाचा खर्चही कंगनाकडून वसूल करण्यात येईल, असंही महापालिकेनं म्हटलं होतं.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: