मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या हृतिकवर drama queen कंगनाने साधला निशाणा

आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या हृतिकवर drama queen कंगनाने साधला निशाणा

आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या हृतिकवर drama queen कंगनाने साधला निशाणा

आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या हृतिकवर drama queen कंगनाने साधला निशाणा

आर्यनचे (Aryan Khan Drugs Case)समर्थन करणाऱ्यासाठी पुढे आलेल्या कलाकारांसाठी कंगनाने(kangana ranaut ) इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. आर्यनचे समर्थन करणाऱ्यांना माफिया पप्पू असे म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 ऑक्टोबर : मागिल आठवड्यात रेव्ह पार्टीत ड्रग्ज(Drugs Case) सापडल्याने बी टाऊनचा किंग खानचा मुलगा आर्यन खानकडे (Aryan Khan)क्रूझवर रेव्ह पार्टीत ड्रग्ज सापडल्याने एनसीबीने त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आर्यन खानसाठी भली मोठी पोस्ट लिहित पाठिंबा दर्शवला. परंतु हृतिकची ही भुमिका drama queen कंगना राणावतच्या ( kangana ranaut targets celebrities who support aryan khan)पचनी पडली नाही. आर्यनचे समर्थन करणाऱ्यांना माफिया पप्पू असे म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्यनचे समर्थन करणाऱ्यासाठी पुढे आलेल्या कलाकारांसाठी कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर म्हटले आहे की... 'आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी पुढे येत आहेत. आपण चुका करतो पण आपण त्याचा गौरव करू नये. मला खात्री आहे की यामुळे त्याला परिणामांची जाणीव होईल. जेव्हा कोणी संवेदनशील परिस्थितीतून जात असेल तेव्हा त्याबद्दल गप्पा मारणे चांगले नाही, परंतु त्याने काही चुकीचे केले नाही हे समजणे गुन्हा आहे. अशा आशयाची स्टोरी कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीला पोस्ट केली आहे. हे वाचा- Hrithik Roshanने aryan Khan साठी लिहिली खास पोस्ट; म्हणाला आयुष्य खूप विचित्र... काही तासांपूर्वी, हृतिक रोशनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भली मोठी पोस्ट लिहित आर्यनचा फोटो शेअर केला होता. 'प्रिय आर्यन आयुष्य एक खूपच विचित्र प्रवास आहे. मात्र ते उत्कृष्टसुद्धा आहे.कारण ते अनिश्चित आहे. एखाद्या हिरोला यातून बाहेर पाडण्यासाठी यासर्व गोष्टींची आवश्यकता असतेच. असे हृतिक म्हणत आर्यनला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
  बॉलिवूडचे अनेक कलाकार आर्यनच्या समर्थनासाठी धावले आहेत. सलमान खान, सुनील शेट्टीसह आता अभिनेता हृतिक रोशननेसुद्धा(Hrithik Roshan) आर्यनला पाठिंबा दिला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Aryan khan, Hritik Roshan, Kangana ranaut, Shah Rukh Khan

  पुढील बातम्या